शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

"पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखासह जेवताना ट्रम्प ओसामाला विसरणार नाहीत अशी आहे"; शशी थरूर यांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:10 IST

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीवरुन खिल्ली उडवली आहे

Shashi Tharur Asim Munir United States Visit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या भेटीवरुन जोरदार चर्चा सुरु झालीय. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीवरुन खिल्ली उडवली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. इस्लामाबाद आणि वॉशिंग्टनमधील लष्करी व धोरणात्मक संबंध अधिक बळकट करण्यासाठी मुनीर हे ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे, असीम मुनीर यांना जेवणासाठी आमंत्रित केल्यानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अमेरिकेला ओसामा बिन लादेन आणि ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यांची आठवण करून दिली.

"पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांना जेवण करताना अमेरिकेने त्यांना दहशतवाद रोखण्याचे निर्देश दिले असतील अशी अपेक्षा आहे. जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अमेरिकेत घुसून २ हजारांहून अधिक लोकांना ठार मारले होते, तो दिवस अमेरिकेने विसरू नये," असं शशी थरुर यांनी म्हटलं आहे. "मला आशा आहे की जेवण चांगले झाले असेल आणि त्यांना विचार करण्यासाठी थोडा वेळ मिळाला असेल. मला आशा आहे की या बैठकीत अमेरिकने पाकिस्तानला आठवण करून दिली असेल की त्यांनी दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये आणि त्यांना प्रशिक्षण देऊ नये," असंही थरुर म्हणाले.

"ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेत पोहोचलेल्या पाकिस्तानी शिष्टमंडळाला अमेरिकन सिनेटर आणि काँग्रेसमननी दहशतवाद पसरवण्याविरुद्ध कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. अमेरिकेतील लोक ओसामाला इतक्या लवकर विसरू शकत नाहीत. ओसामा पाकिस्तानी लष्करी तळाजवळ एका सुरक्षित ठिकाणी सापडला. ओसामाला लपवण्याची पाकिस्तानची चूक अमेरिका सहजपणे विसरू शकणार नाही आणि माफही करू शकणार नाही. मला आशा आहे की जेव्हा जनरलला वाइन देण्यात येईत तेव्हा त्यांना या सर्व गोष्टींची आठवण येईल आणि हे अमेरिकेच्या हिताचे आहे," असंही शशी थरुर म्हणाले.

बुधवारी ट्रम्प यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर यांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणण्यात मुनीर यांनी मला मदत केल्याचे ट्रम्प म्हणाले, "पाकिस्तानकडून परिस्थिती शांत करण्यात असीम मुनीर यांचा खूप प्रभाव होता आणि भारताकडून पंतप्रधान मोदींनीही मोठे योगदान दिले," असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.  ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सय्यद असीम मुनीर यांना अमेरिकेच्या आर्मी डेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र हे वृत्त खोटं असल्याचं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं. अमेरिकन लष्कराच्या परेडसाठी असीम मुनीर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेलं नाही, असं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान