शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कबुली : पुलवामा हल्ला हे इम्रान खान सरकारचेच कारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 06:38 IST

pulwama attack News : २० महिन्यांनंतर पाकिस्तानच्या मंत्र्याने थेट संसदेतच दिली माहिती

इस्लामाबाद :भारतातील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हे पाकिस्तानचेच कारस्थान होते, हे आता स्पष्ट झाले आहे. तशी कबुलीच खुद्द पाकिस्तानच्या मंत्र्याने दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत मंत्री फवाद चौधरी यांनी या हल्ल्याचे समर्थन करताना इम्रान खान सरकारचे हे मोठे यश असल्याचा दावा केला.  पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताला चोख प्रत्युत्तर दिल्याचेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानी हवाई दलाने भारतात घुसून भारतीय जवानांना मारल्याचा दावाही त्यांनी केला. पाकमधील विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री फवाद चौधरी म्हणाले, आम्ही भारताला त्यांच्या हद्दीत घुसून मारलं आहे आणि पुलवामात जे यश मिळालं ते इम्रान खान सरकारचंच मोठं यश आहे. रात्री उशिरा चौधरी यांनी आपण असे म्हणालोच नसल्याचे सांगत यू टर्न घेतला. 

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावर पुलवामा येथे सुरक्षा दलांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ४० जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.  

मोदी-मोदीच्या घोषणांनी दणाणली पाकची संसद बलुचिस्तानच्या खासदारांनी पाकिस्तानच्या  संसदेत मोदी-मोदी आणि आझादीच्या घोषणा दिल्या. ज्यामुळे परराष्ट्र मंत्र्यांचा चेहरा रागाने लालबुंद झालेला पाहण्यास मिळाला.  पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री हे फ्रेंच उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासंबंधीची त्यांची भूमिका  मांडत होते. त्या वेळी बलुचिस्तानच्या खासदारांनी मोदी-मोदी आणि आझादी या घोषणा दिल्या. इम्रान खान सरकारवर असलेला राग  यातून दिसून आला.  

पाकिस्तानचे मंत्री दहशतवादाचे समर्थक असल्याचे झाले उघड पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी  पुलवामा हल्ला हे पंतप्रधान इम्रान खान सरकारचे मोठे यश होते, असे वक्तव्य करत इम्रान यांच्या अडचणींत भर घातली आहे. पाकिस्तानचे  मंत्री उघडउघड दहशतवादाचे समर्थन करत असल्याचा हा ढळढळीत पुरावा असल्याची टिप्पणी भारताने केली आहे. काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये जमिनी घेण्याच्या केंद्राच्या नियमावर पाकिस्तानने केलेली टीका भारताने फेटाळून लावली आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत