पत्नी प्रेग्नेंट झाल्याची पतीने केली तक्रार, अधिकाऱ्यांनी केलेली विचित्र मागणी ऐकून झाला हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 02:31 PM2021-09-04T14:31:51+5:302021-09-04T14:32:29+5:30

मॉडर्न इव्हिनिंग टाइम्सच्या रिपोर्टनुसार, Zhejiang प्रांतातील Jiaxing मध्ये राहणारा Wang आणि त्याच्या पत्नीला आधीच दोन अपत्य आहेत.

Complaint about wife being pregnant officer said first prove that you know correct use of condom | पत्नी प्रेग्नेंट झाल्याची पतीने केली तक्रार, अधिकाऱ्यांनी केलेली विचित्र मागणी ऐकून झाला हैराण

पत्नी प्रेग्नेंट झाल्याची पतीने केली तक्रार, अधिकाऱ्यांनी केलेली विचित्र मागणी ऐकून झाला हैराण

googlenewsNext

चीनमध्ये कंडोमचा वापर करूनही एका पुरूषाची पत्नी प्रेग्नेंट झाली. जेव्हा त्याने कंडोम तयार करणाऱ्या कंपनी विरोधात रेग्युलेटरी अथॉरिटीकडे तक्रार केली तर त्याच्यासमोर विचित्र अट ठेवण्यात आली. अधिकारी त्याला म्हणाले की, ते तेव्हाच टेस्ट करतील जेव्हा पीडित पुरूष हे सिद्ध करेल की, त्याला कंडोमचा योग्य वापर करता येतो.

मॉडर्न इव्हिनिंग टाइम्सच्या रिपोर्टनुसार, Zhejiang प्रांतातील Jiaxing मध्ये राहणारा Wang आणि त्याच्या पत्नीला आधीच दोन अपत्य आहेत. त्याचा संसार आनंदाने जीवन जगत होता आणि त्यांना तिसरं बाळही नको होतं. त्यामुळे त्यांनी शरीरसंबंधावेळी कंडोमचा वापर केला. 

कंडोमला छिद्र असल्याने झाली प्रेग्नेंट

Wang नुसार, संबंधानंतर त्याने जेव्हा कंडोम पाहिला तर त्याला त्यात एक छिद्र दिसलं. यामुळे त्याच्या मनात पत्नी प्रेग्नेंट झाल्याची शक्यता जाणवली. त्याने लगेच पत्नीला याबाबत सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी गर्भनिरोधाक गोळी आणून पत्नीला दिली. पण त्या गोळीने काही फायदा झाला नाही. त्यानंतर पत्नीला रोज मॉर्निंग सिकनेस राहू लागला होता. ज्यामुळे त्याच्या पत्नीला नोकरी सोडावी लागली.

Wang चा आरोप आहे की,  त्याच्या जीवनात आलेल्या या सर्व  समस्यांसाठी कंडोमच्या खराब क्वालिटीला त्याने जबाबदार धरलं. त्याने कंडोम विकणाऱ्या दुकानदार आणि निर्माता कंपनीकडे तक्रार केली. पण त्यावर काही कारवाई करण्यात आली नाही. कंपनीने त्याला सांगितलं की, कंडोमच्या क्वालिटीमध्ये काही समस्या नव्हती. कंपनीने त्याला कंडोम आणि गर्भनिरोधक गोळीचे पैसे परत देण्याची ऑफर दिली. जी त्याने नाकारली.

रेग्युलेटरी अथॉरिटीने ठेवली अजब अट

कंपनीच्या रिप्लायवर अंसतुष्ट Wang ने लोकल मार्केट रेग्युलेटरी अथॉरिटीकडे तक्रार केली. त्याने मागणी केली की, कंपनीच्या कंडोमच्या क्वालिटीची टेस्ट घ्यावी आणि त्याला पुरेशी नुकसान भरपाई द्यावी. रिपोर्टनुसार, अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली. सोबतच एक अजब अटही ठेवली.

कोर्टात जाणार Wang

अथॉरिटीने सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी तेव्हाच केली जाईल जेव्हा Wang हे सिद्ध करेल की, त्याला कंडोम वापर योग्य प्रकारे करता येतो. अथॉरिटीच्या या अटीमुळे Wang हैराण झााल आहे. तो म्हणाला की, तो हे कसं सिद्ध करू शकतो की, त्याला कंडोमचा वापर करता येतो. Wang ने इशारा दिला आहे की, जर अथॉरिटीने त्याच्या तक्रारीवर कारवाई केली नाही तर तो याप्रकरणी कोर्टात जाईल.
 

Web Title: Complaint about wife being pregnant officer said first prove that you know correct use of condom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.