गांधीजींच्या अवमानाबाबत कंपनीची माफी

By Admin | Updated: January 5, 2015 07:29 IST2015-01-05T06:50:41+5:302015-01-05T07:29:53+5:30

शांतिदूत महात्मा गांधी यांच्याप्रती आदर करणे, हा आमचा हेतू होता. एवढेच नाही तर गांधींजीचे नातू आणि नातीने हे लेबल पाहून प्रशंसाही केली

Company apology for the disrespect of Gandhiji | गांधीजींच्या अवमानाबाबत कंपनीची माफी

गांधीजींच्या अवमानाबाबत कंपनीची माफी

वॉशिंग्टन/हैदराबाद : शांतिदूत महात्मा गांधी यांच्याप्रती आदर करणे, हा आमचा हेतू होता. एवढेच नाही
तर गांधींजीचे नातू आणि नातीने हे लेबल पाहून प्रशंसाही केली होती, असे न्यू इंग्लड ब्रुर्इंग कंपनीचे भागीदार मॅट वेस्टफॉल यांनी वादग्रस्त बीयरबाबत माफी मागताना म्हटले आहे. तथापि, भारतीयांच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही
माफी मागतो.
‘गांधी बॉट’ असे या बीअरचे नाव आहे. यात तीन प्रकारच्या बीअरचे मिश्रण आहे. हे लेबल अपमानजक वाटत असेल तर आम्ही माफी मागतो. कोणाचा अपमान करण्याचा आमचा हेतू नाही.
आमचा हेतू शुद्ध...
ज्यांचा आम्ही नितांत
आदर करतो अशा महान व्यक्तीचा सन्मान करणे आणि त्यांचे
स्मरण करणे, हाच आमचा हेतू आहे. सुगंधी आणि पूर्ण शाकाहारी असलेली गांधी बॉट चित्तशुद्धी, तसेच सत्य आणि प्रेम भावनेसाठी सहायक आहे, असेही या कंपनीने आपल्या वेबसाईटवर म्हटले त्याचा हेतू समजून घ्यावा, असेही कंपनीने म्हटले
आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Company apology for the disrespect of Gandhiji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.