शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

संवाद हरपला! आईच्या हातातला मोबाइल करतोय मुलाचा घात; काय आहे धक्कादायक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 08:09 IST

मोबाइलवरील एका मिनिटामुळे मुलांशी १६ टक्के संवाद हरपला, बाल्य विकास नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनात नवीन माता आणि अर्भकांचा समावेश होता.

ऑस्टिन - आईने मोबाइलवर घालवलेल्या प्रत्येक मिनिटाचा मुलांवर परिणाम होत आहे. आई मोबाइलवर एक मिनिट घालवते याचा अर्थ ती तिच्या मुलांशी जवळपास १६ टक्के शब्द कमी बोलते. यातून मुले उशिरा बोलण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे,  असा धक्कादायक निष्कर्ष नुकत्याच प्रसिद्ध एका संशोधनातून पुढे आला आहे. टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार जर एखादी आई स्मार्ट फोन वापरत असेल तर ती आपल्या मुलांशी कमी बोलते. दररोज दीड ते तीन वर्षे वयोगटातील सुमारे १० लोक या प्रकारची समस्या घेऊन रुग्णालयात पोहोचत आहेत.

संयुक्त कुटुंबच ठरतेय फायद्याचे मुलांमध्ये उशिरा बोलायला लागण्याची समस्या विभक्त कुटुंबांमध्ये आणि काम करणाऱ्या पालकांच्या मुलांमध्ये जास्त आहे. संयुक्त कुटुंबात राहणारे मूल सतत नवनवीन गोष्टी ऐकत असते आणि कुटुंबातील सदस्यांच्या हालचालींचे निरीक्षण करत असते. त्यामुळे मुलास नऊ महिन्यांत भाषेचे आकलन होते.

मुलाला फक्त इशारे कळतातआम्ही नोकरी करणारे पालक आहोत, व्यवसाय आहे. दिवसभर मुलासोबत ऑनलाइन काम पाहावे लागते. त्यामुळे मोबाइलवर सतत काम करावे लागते. काम करताना आम्ही मुलाशी नीट संवाद साधला नाही. त्यातून मुलगा वेळेवर बोलायला शिकू शकला नाही. फक्त इशारे त्याला समजतात. आता मी काम सोडले आहे आणि माझा पूर्ण वेळ मुलाला देत आहे, अशी प्रतिक्रिया एका महिलेने व्यक्त केली. त्यावरून ही समस्या किती गंभीर आहे याचा अंदाज येतो.

काय आहे धक्कादायक?बाल्य विकास नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनात नवीन माता आणि अर्भकांचा समावेश होता. यावेळी बाळांनी लहान ऑडिओ रेकॉर्डर घातले होते, तर त्यांच्या मातांच्या फोन वापरावर स्मार्टफोन लॉगद्वारे निरीक्षण केले जात होते. टीमने १६,००० मिनिटांच्या संकलित केलेल्या डेटाचे विश्लेषण केले आणि आढळले की जर आई एक मिनिट फोनवर व्यस्त असेल तर ती मुलाशी १६ टक्के कमी शब्द बोलू शकते. हा कालावधी जसजसा वाढत जातो तसतसा आई-मुलाचा संवाद आणखी कमी होतो. या विश्लेषणाची सरासरी पाहिल्यास, आई आणि नवजात बालकांमधील संभाषणात २६  टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल