दहशतवादी अड्डे बंद करा, अमेरिकेचा पाकला सज्जड दम

By Admin | Updated: August 31, 2015 23:06 IST2015-08-31T23:06:57+5:302015-08-31T23:06:57+5:30

पाकिस्तानने आपल्या भूमीवरील सर्व दहशतवादी अड्डे बंद करण्यासह हक्कानी चौकडीविरुद्धही कठोर कारवाई करावी, असे अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान

Close the terrorists' base | दहशतवादी अड्डे बंद करा, अमेरिकेचा पाकला सज्जड दम

दहशतवादी अड्डे बंद करा, अमेरिकेचा पाकला सज्जड दम

वॉशिंग्टन/ इस्लामाबाद : पाकिस्तानने आपल्या भूमीवरील सर्व दहशतवादी अड्डे बंद करण्यासह हक्कानी चौकडीविरुद्धही कठोर कारवाई करावी, असे अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राईस यांनी इस्लामाबाद भेटीत तेथील सरकारला बजावले. मात्र भारताविरुद्धच्या पाकच्या अतिरेकी कारवायांचा त्यांनी उल्लेखही केला नाही.
राईस यांनी पाकच्या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान रविवारी पंतप्रधान नवाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांच्यासह तेथील वरिष्ठ नेत्यांना कडक संदेश दिला. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला चालना देण्यासाठी देशातील दहशतवादी अड्ड्यांविरुद्धची कारवाई गतिमान करावी, असे आवाहन त्यांनी केले.
अफगाणिस्तानातील अलीकडच्या घातक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हक्कानी चौकडीविरुद्ध ठोस पावले उचलण्यात यावीत, असे आवाहन केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Close the terrorists' base