शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भारतात आयोजित करू हवामान परिषद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवला प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 06:30 IST

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२८ मध्ये संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी दिला, तसेच लोकांच्या सहभागातून ‘कार्बन सिंक’ तयार करण्यावर भर देणारा ‘ग्रीन क्रेडिट’ उपक्रम सुरू केला.  

दुबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२८ मध्ये संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी दिला, तसेच लोकांच्या सहभागातून ‘कार्बन सिंक’ तयार करण्यावर भर देणारा ‘ग्रीन क्रेडिट’ उपक्रम सुरू केला.  

दुबईत संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेदरम्यान संबोधित करताना ते म्हणाले की, विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यातील समतोल राखून भारताने जगासमोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. भारत हा जगातील अशा काही देशांपैकी एक आहे जो १.५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानवाढ मर्यादित ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदान देण्याच्या मार्गावर आहे.

सीओपी २८ चे अध्यक्ष सुल्तान अल जाबेर आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदलाचे अध्यक्ष सायमन स्टिल यांच्यासह उद्घाटन कार्यक्रमास पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती होती. विकसनशील देशांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मदत म्हणून श्रीमंत देशांकडून तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. 

प्रमुख नेत्यांची उपस्थिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी आणि तुर्कीचे अध्यक्ष रजब तैयब एर्दोआन येत्या दोन दिवसांत परिषदेत संबोधित करणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय