इंग्लंडमधला सिगारेट ओढणारा पक्षी
By Admin | Updated: March 16, 2016 11:35 IST2016-03-16T11:33:35+5:302016-03-16T11:35:03+5:30
सिगारेट आरोग्याला हानिकारक आहे हे माहित असूनही धुम्रपान करणा-या व्यक्ती धुम्रपान सोडत नाहीत. ते सिगारेट ओढण्याचा आनंद घेतात.

इंग्लंडमधला सिगारेट ओढणारा पक्षी
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १६ - सिगारेट आरोग्याला हानिकारक आहे हे माहित असूनही धुम्रपान करणा-या व्यक्ती धुम्रपान सोडत नाहीत. ते सिगारेट ओढण्याचा आनंद घेतात.
माणसाप्रमाणे पक्ष्यांनादेखील धुम्रपानात आनंद मिळतो का ? हा प्रश्न विचारण्याचा कारण म्हणजे इंग्लंडमध्ये सिगारेट ओढणा-या मॅगपी पक्ष्याचा फोटो व्हायरल झाला आहे. मँचेस्टर शहरातील एका भितींवर हा मॅगपी पक्षी चोचेमध्ये सिगारेट पकडून बसला आहे.
@WillMcHoebag या टि्वटर वापरकर्त्याने हा फोटो टि्वट केला आहे. हा फोटो खरा आहे की, बनवला आहे यावरुन टि्वटर युझर्समध्ये वाद रंगला आहे. 'मिनव्हाईल इन मॅंचेस्टर' अशी या फोटोला कॅप्शन दिली आहे.