शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

अमेरिकेच्या मनात बसली उत्तर कोरियाची दहशत! काही महिन्यात अण्वस्त्र हल्ल्याच्या भितीने CIA चिंतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 16:54 IST

उत्तर कोरिया आपल्यावर अण्वस्त्र हल्ला करेल अशी भिती अमेरिकेला वाटत आहे. अमेरिकेपर्यंत पल्ला असलेली अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे उत्तर कोरियाच्या ताफ्यात असू शकतात असे अमेरिकेला वाटते.

ठळक मुद्देउत्तर कोरियाचा नेता किम जोंग उनपासून असणा-या धोक्याविषयी आमच्या गुप्तचरयंत्रणेमध्ये नेहमी चर्चा होत असते. उत्तर कोरियाच्या संभाव्य हालचालींविषयी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांपर्यंत अचूक गुप्तचर माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.

वॉशिंग्टन - उत्तर कोरिया आपल्यावर अण्वस्त्र हल्ला करेल अशी भिती अमेरिकेला वाटत आहे. अमेरिकेपर्यंत पल्ला असलेली अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे उत्तर कोरियाच्या ताफ्यात असू शकतात असे अमेरिकेला वाटते. अमेरिकेला त्याचीच चिंता लागून राहिली आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएचे प्रमुख माईक पॉम्पिओ यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली.  

उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उनपासून असणा-या धोक्याविषयी आमच्या गुप्तचरयंत्रणेमध्ये नेहमी चर्चा होत असते असे पॉम्पिओ यांनी सांगितले. पुढच्या काही महिन्यात उत्तर कोरिया अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला करेल का ? त्याविषयी आमची चर्चा होते. उत्तर कोरियाच्या संभाव्य हालचालींविषयी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांपर्यंत अचूक गुप्तचर माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. जेणेकरुन या संकटाचा समर्थपणे सामना करता येईल असे पॉम्पिओ यांनी सांगितले. 

उत्तर कोरियाच्या विरोधात सैन्यबळाचा वापर केल्यास मोठया प्रमाणावर जिवीतहानी होईल असे पॉम्पिओ म्हणाले. किमला हटवणे किंवा त्याला अमेरिकेविरोधात अण्वस्त्राचा वापर करण्यापासून कसे रोखायचे यावर विचार केल्यास अनेक गोष्टी शक्य आहेत असे ते म्हणाले. उत्तर कोरियाचा हुकूमशहा वारंवार शक्तिप्रदर्शन करून आपल्या विरोधी देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अमेरिका,  दक्षिण कोरिया आणि जापान संयुक्तपणे  युद्धसराव करत असतात. मागच्या महिन्यातही अशाच प्रकारचा युद्धासराव झाला.

 अमेरिकेच्या विमानांनी गुआम येईल हवाईहद्दीतून उड्डाण केले होते. या संयुक्त सरावामध्ये अमेरिकेची एफ-२२ आणि एफ-३५ स्टील्थ फायटर विमाने सहभागी झाली होती. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर हा युद्धसराव करण्यात येत आहे.  उत्तर कोरियाने वॉसाँग-15 या आपल्या नव्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचे फोटो प्रसिद्ध करून अमेरिकेच्या कुठल्याही शहरावर हल्ला करण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम असल्याचा दावाही केला होता. उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाच्या वर्तमानपत्रात हे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. फोटो प्रसिद्ध होताच अमेरिकेसह उत्तर कोरियाच्या विरोधात असणा-या देशांच्या शास्त्रज्ञांनी हे क्षेपणास्त्र किती घातक ठरु शकते त्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती.  तज्ञांच्या म्हणण्यानुसार वॉसाँग-15 हे यापूर्वीच्या क्षेपणास्त्राच्या तुलनेत आकाराने मोठे आणि टेक्नोलॉजीमध्ये अधिक सरस आहे. उत्तर कोरियाने ही चाचणी करताना आपल्याच देशात बनवलेल्या मोबाइल लाँचरचा उपयोग केला. शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राच्या रेंजबद्दल मात्र शंका उपस्थित केली आहे.                 

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाAmericaअमेरिका