शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 09:07 IST

सीमावर्ती भागात आमचे सैन्य शांतता व संयम राखण्यासाठी कटिबद्ध आहे, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले आहेत.

ठळक मुद्देचीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) व भारतीय लष्कर यांच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या जवानांमध्ये शनिवारी सिक्कीममध्ये व रविवारी दुपारी लडाखमध्ये तणातणी व शारीरिक हाणामारीच्या दोन घटना घडल्या. दोन्ही बाजूंच्या जवानांना किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर आता या प्रकरणावर चीनकडून प्रतिक्रिया आली आहे. सीमावर्ती भागात आमचे सैन्य शांतता व संयम राखण्यासाठी कटिबद्ध आहे, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले आहेत.

बीजिंगः चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) व भारतीय लष्कर यांच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या जवानांमध्ये शनिवारी सिक्कीममध्ये व रविवारी दुपारी लडाखमध्ये तणातणी व शारीरिक हाणामारीच्या दोन घटना घडल्या. त्यात दोन्ही बाजूंच्या जवानांना किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर आता या प्रकरणावर चीनकडून प्रतिक्रिया आली आहे. सीमावर्ती भागात आमचे सैन्य शांतता व संयम राखण्यासाठी कटिबद्ध आहे, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले आहेत.दोन्ही देशांनी आपापले मतभेद नीट सोडवावेत. चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या सैन्याने आमच्या सीमावर्ती भागात  शांतता व संयम कायम राखला आहे. चीन आणि भारत सीमेवरील वादासंदर्भात विद्यमान यंत्रणा वारंवार एकमेकांशी संवाद साधून समन्वय साधत आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे. चीनकडून घेण्यात येत असलेल्या आक्रमक पवित्र्यासंदर्भात विचारले असता, ते म्हणाले संबंधित संकल्पना निराधार आहे. भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक संबंधांचे हे 70वे वर्षांपासूनचे आहेत आणि दोन्ही देशांनी कोरोनाविरोधात एकत्र लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंनी एकत्रित काम केले पाहिजे आणि मतभेद योग्य प्रकारे सोडवले पाहिजेत. सीमाभागात शांतता व स्थिरता कायम ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या द्विपक्षीय संबंधांना अनुकूल वातावरण निर्माण होऊन कोरोनाविरुद्ध एकत्र लढा देता येईल. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतरही चीन आणि  भारतामध्ये संवाद सुरू आहे. तसेच भारतीय लष्करानंही अशा प्रकारच्या घटना सीमेवर होत असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारताच्या बाजूला असलेल्या नाल्याजवळ रविवारी दुपारी चीनचे सैनिक भारतीय सैनिकांच्या अंगावर धावून आल्याने दोघांमध्ये झटापट व धक्काबुक्की झाली होती.स्थानिक पातळीवर चर्चेनंतर आता परिस्थिती निवळली असली तरी अजूनही तेथे दोन्ही बाजूचे सैनिक समोरासमोर आहेत. लष्करी मुख्यालयातील सूत्रांनी याला दुजोरा देताना सांगितले की, प्रत्यक्ष सीमारेषा अनेक ठिकाणी स्पष्टपणे आखलेली नसल्याने दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये अशा घटना क्वचितप्रसंगी घडत असतात. ठरलेल्या प्रक्रियेनुसार स्थानिक पातळीवर चर्चा होऊन समजूत घातल्यानंतर असा तात्कालिक वाद सोडविला जातो. एप्रिलच्या अखेरपासून ‘पीएलए’ने आक्रमक पवित्रा घेतल्याने या ताज्या घटनांना सुरुवात झाली आहे. २७ एप्रिल रोजी चिनी सैन्याचे एक वाहन भारताच्या हद्दीत आले होते. भारतीय सैनिकांनी हटकल्यावर ते परत माघारी गेले होते.गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लडाकमधील पॅनगाँग त्से सरोवराच्या उत्तर किना-यावर तसेच चुमार व यांगत्से भागातही अशाच घटना घडल्या होत्या. त्याआधी जून २०१७ मध्ये सिक्कीमजवळच्या डोकलाम पठारावर दोन्ही सैन्यांमध्ये ७३ दिवसांचा वाद झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात वुहान येथे पहिली अनौपचारिक शिखर बैठक झाल्यानंतर त्या वादावर पडदा पडला होता.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

कोरोनामुळे अमेरिकेत वाढला मृतांचा आकडा; तरीही ट्रम्प उचलणार ‘हे’ धोकादायक पाऊल?

"आम्हाला जास्त काही नको, पण किमान पगार द्या"; डॉक्टरांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

“सरकारने आधी कोरोनाच्या तिरडीवरून उठावे; लोक आपोआप कामधंद्याला लागतील”

टॅग्स :chinaचीनDoklamडोकलामsikkimसिक्किमIndiaभारत