चीनच्या मंदिरात बोलणारा रोबोट

By Admin | Updated: April 22, 2016 23:03 IST2016-04-22T23:03:35+5:302016-04-22T23:03:35+5:30

लाँगक्वान या मंदिरात बौद्ध मंत्र म्हणणारा महंत रोबोट बनवण्यात आला आहे. हा रोबोट मंत्रासोबत अनुयायांशी सामान्य भाषेत संवादही साधतो.

Chinese robot speaker in China | चीनच्या मंदिरात बोलणारा रोबोट

चीनच्या मंदिरात बोलणारा रोबोट

ऑनलाइन लोकमत

चीन, दि. 22- बेल्जियमच्या जवळ असलेल्या बौद्ध मंदिरात परंपरा जपण्यासाठी आणि अनुयायांना आकर्षित करण्यासाठी बौद्ध धर्म आणि विज्ञानाचा मिलाप घालण्यात आला आहे. लाँगक्वान या मंदिरात बौद्ध मंत्र म्हणणारा महंत रोबोट बनवण्यात आला आहे. हा रोबोट मंत्रासोबत अनुयायांशी सामान्य भाषेत संवादही साधतो. 60 सेंटीमीटर रुंद आणि 2 फूट उंचीचा हा कार्टूनसारखा दिसणारा झियानेर रोबोट एखाद्या साधूसारखे हावभाव करतो. झियानेर हा रोबोट बौद्ध धर्मातल्या 20 साध्या प्रश्नांची दररोज उत्तरे देतो. तो त्याच्या पायाखालच्या चाकांनी सात वेगवेगळ्या प्रकारच्या हालचालीही करतो. झियानेर हा महंत रोबोट चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करतो आहे. विज्ञान आणि बौद्ध धर्म हे विपरीत नाही, ते एकमेकांच्या अनुकूल असल्याचंही हा महंत रोबोट अनुयायांना सांगतो. महंत रोबोटच्या मते, बौद्ध धर्मामुळे माणसाची जीवनशैली विकसित होते. स्मार्ट फोन वापरण्याचा बदलही बौद्ध धर्मामुळेच माणसात झाला असल्याचं झियानेर या रोबोटचं म्हणणं आहे. हा रोबोट सध्या चीनमध्ये चर्चेचा विषय ठरतो आहे.
 

Web Title: Chinese robot speaker in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.