कुनमिंग ते कोलकता रेल्वेमार्गाचा चीनचा प्रस्ताव
By Admin | Updated: June 18, 2015 08:53 IST2015-06-18T01:39:05+5:302015-06-18T08:53:15+5:30
चीनमधील कुनमिंग शहर ते भारतातील कोलकता शहरापर्यंत हाय स्पीड रेल्वेसेवा सुरू करण्याचा चीनचा प्रस्ताव असून, चीनच्या प्राचीन रेशमी

कुनमिंग ते कोलकता रेल्वेमार्गाचा चीनचा प्रस्ताव
हायस्पीड रॅल्वे : रेशीम मार्गाचे पुनरुज्जीवन करणार
कुनमिंग : चीनमधील कुनमिंग शहर ते भारतातील कोलकता शहरापर्यंत हाय स्पीड रेल्वेसेवा सुरू करण्याचा चीनचा प्रस्ताव असून, चीनच्या प्राचीन रेशमी मार्गाचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नातील हा एक टप्पा आहे. म्यानमार व बांगलादेशातून चीनचा हा सिल्क रूट जात आहे.
चीनने अलीकडेच ग्रेटर मेकाँग उपविभाग तयार करण्याची कल्पना मांडली होती. त्यात बांगलादेश, चीन, भारत व म्यानमार असा बहुद्देशीय कॉरीडॉर प्रकल्प तयार करण्याचा प्रस्ताव आहे. यात पुढाकार अर्थातच चीनचा असेल.
आम्हाला कुनमिंग ते कोलकता ही रेल्वेसेवा, तसेच ग्रेट मेकाँग उपविभागाचा विस्तार करायचा आहे. यामुळे म्यानमार व बांगलादेश यांचाही विकास होईल असे युनान प्रांतिक सरकारचे उपमंत्री ली जी मिंग यांनी सांगितले.
आशियाई विकास बँकेकडून या प्रकल्पाला मदत मिळू शकते असेही त्यांनी म्हटले आहे.
चीनमधील युनान प्रांत भौगोलिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी वसला असून, या प्रांताचे भारत-चीन -भारत योजनेशी तसेच ग्रेट मेकाँग प्रकल्पाशी संबंध प्रस्थापित होऊ शकतात. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून कुनमिंग ते नवी दिल्ली विमानसेवा पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहे.
-हा मार्ग २८०० कि. मी. चा असून, हा कॉरीडॉर विकसित झाल्यास सीमावर्ती व्यापार वाढेल, तसेच लोकांचे येणे-जाणेही वाढेल.
-चीनने जुना सिल्क रूट विकसित करण्यासाठी ४० अब्ज डॉलर खर्च करण्याचा निर्धार केला असून, हा मार्ग विकसित झाल्यास १३२ अब्ज डॉलरचा व्यापार होईल असा चीनचा अंदाज आहे.
-कुनमिंग ते कोलकता रेल्वेमार्ग सुरू होणे हा पहिला टप्पा आहे. या दोन्ही शहरांमधील अंतर ९२३ मैल (१४८५.४२ कि.मी.) आहे.