चीनचा माल ट्रेनने पोहोचणार लंडनच्या बाजारपेठेत

By Admin | Updated: January 4, 2017 13:10 IST2017-01-04T13:08:54+5:302017-01-04T13:10:34+5:30

चीनने युरोपची बाजारपेठ काबीज करण्यासाठी थेट लंडनपर्यंत ट्रेन मालवाहतुक सेवा सुरु केली आहे.

The Chinese goods train will reach the London market | चीनचा माल ट्रेनने पोहोचणार लंडनच्या बाजारपेठेत

चीनचा माल ट्रेनने पोहोचणार लंडनच्या बाजारपेठेत

ऑनलाइन लोकमत 

बिजींग, दि. 4 - व्यापाराच्या माध्यमातून जगभरात हातपाय पसरणा-या चीनने युरोपची बाजारपेठ काबीज करण्यासाठी थेट लंडनपर्यंत ट्रेन मालवाहतुक सेवा सुरु केली आहे. चीनच्या पूर्व झीहीजियांग प्रांतातील यीवु येथून मालगाडीने लंडनासाठी प्रस्थान केले आहे. 18 दिवस 12 हजार किलोमीटरचा प्रवास करुन ही ट्रेन ब्रिटनला पोहोचणार आहे. 
 
कझाकस्तान, रशिया, पोलंड, जर्मनी, बेलजियम आणि फ्रान्स या देशांमधून ही ट्रेन जाणार आहे. यीवु टाईमेक्स इंडस्ट्रीयल इनवेसमेंट कंपनी ही ट्रेन सेवा चालवणार असल्याची माहिती चीन प्रसारमाध्यमांनी दिली आहे. सध्या या कंपनीकडून स्पेन माद्रिदपर्यंत ट्रेन मालवाहतूक सेवा चालवली जाते. 
 
हवाई मार्गाच्या तुलनेत रेल्वेने मालवाहतुकीचा खर्च  निम्म्यावर येतो तसेच समुद्रामार्गापेक्षा कमी वेळात माल पोहोचतो. ब्रिटनची युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु आहे. युरोपियन कंपन्यांच्या हातून बाजारपेठ निसटणार आहे. अशावेळी अब्जावधील डॉलर्सची चीनी गुंतवणूक ब्रिटनमध्ये आणण्याचा ब्रिटनच्या पंतप्रधानांचा उद्देश आहे. थेट चीन ते लंडन ट्रेन मालवाहतूक याच मोहिमेचा भाग आहे. 
 

Web Title: The Chinese goods train will reach the London market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.