शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय लष्कराच्या दणक्याने ड्रॅगनचे धाबे दणाणले, राजनाथ सिंहांच्या भेटीसाठी मॉस्कोमध्ये चिनी संरक्षण मंत्र्यांची धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 07:18 IST

भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनाती वाढवल्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चीनची कोंडी झाली आहे.

मॉस्को/ नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघे यांनी भारतासोबत चर्चा करण्याची विनंती केली आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघे यांनी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारची वेळ मागितली आहे. मात्र भारताकडून त्याला अद्याप प्रतिसाद देण्यात आलेला नाही.भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून लडाखमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. दरम्यान, २९-३० रोजी पँगाँग सरोवर परिसरात झालेल्या झटापटीवेळी भारतीय लष्कराने चिनी सैन्याला पुन्हा एकदा आपला हिसका दाखवला होता. तसेच सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण भागांवर आपले पाय रोवले होते. त्यामुळे चिनी सैन्याला माघार घ्यावी लागली होती. दरम्यान, भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनाती वाढवल्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चीनची कोंडी झाली आहे.

दरम्यान, सध्या भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे चिनी समकक्ष वेई फेंघे हे शांघाई सहयोग संघटना (एससीओ) च्या बैठकीसाठी मॉस्कोमध्ये आहेत. दरम्यान, चिनी संरक्षण मंत्र्यांनी लडाखमध्ये तणाव वाढलेला असतानाच चर्चेसाठी विनंती केल्याने त्याचं महत्त्व वाढलं आहे.रशियासोबत मोठी डील! लडाखमध्ये लढण्यासाठी खतरनाक AK-47 203 मिळणारचीनला एकदा दोनदा नाही अनेकदा नडणाऱ्या भारतीय सैनिकांना मोठे घातक शस्त्र मिळणार आहे. भारत आणि रशियाने अद्ययावत अङ-47 203 रायफलींची डील फायनल केली आहे. जुन्या मॉडेलपेक्षा ही रायफल हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये, लडाखसारख्या किंवा कारगिलसारख्या उंच ठिकाणी लढण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. यामुळे उंचीवर लपलेल्या शत्रूच्या सैनिकांना खालूनच अचूक टिपता येणार आहे. चीनसोबतचा तणाव आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये सीमाविवाद पाहता ही डील खूप महत्वाची मानली जात आहे. रशियन वृत्तसंस्थांनुसार भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौऱ्यावर असून हा निर्णय त्यांच्याच मार्गदर्शनात घेण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे पहिली  AK-47  ही रायफल रशियानेच तयार केली होती. आता जगभरात या रायफली बनविल्या जातात. परंतू रशियाकडे सध्या नवीन पिढीची खतरनाक रायफल आहे. ही रायफल भारताकडील इन्सास रायफलींची जागा घेणार आहे. हिमालयाच्या उंच जागांवर ही रायफल जाम होणे किंवा मॅगझिन तुटण्यासारख्या घटना वाढल्या आहेत. यामुळे नवीन राफलची भारतीय सैन्याला नितांत गरज आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनRajnath Singhराजनाथ सिंह