शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

चिनी अधिकाऱ्यानंच केली त्यांच्या कोरोना लशीची 'पोल-खोल'; जिनपिंग सरकारनं उचललं असं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 19:31 IST

विशेष म्हणजे, चीनने काही देशांना कोरोना लशीचे कोट्यवधी डोस दिले असतानाच गाओ फू (Gao Fu) यांनी हे वक्तव्य केले आहे.

बिजिंग - चिनी कोरोना लस कितपत प्रभावी आहे, यावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता चिनी अधिकारीच त्यांच्या व्हॅक्‍सीन फ्रॉडची पोल खोल करत आहेत. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या एका वरिष्ठ रोग नियंत्रण अधिकाऱ्याने म्हटले आहे, की देशात विकसित करण्यात आलेले कोरोनाचे डोस कमी प्रभावी आहेत. एवढेच नाही, तर चीनमधील शी जिनपिंग सरकार या लशींना अधिक प्रभावी बनविण्यावर विचार करत असल्याचेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

चीनच्या रोग नियंत्रण केंद्राचे (China Centers for Disease Control) संचालक गाओ फू (Gao Fu) यांनी म्हटले आहे, की चिनी लशीचा बचाव दर फार अधिक नाही. ते शनिवारी चेंगदू शहरात एका सेमिनारमध्ये बोलत होते. ते म्हणाले, कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरणात वेगवेगळ्या लशींचा वापर करायला हवा की नको, यावर आता चीनमध्ये गांभीर्याने विचार केला जात आहे.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

विशेष म्हणजे, चीनने काही देशांना कोरोना लशीचे कोट्यवधी डोस दिले असतानाच गाओ फू (Gao Fu) यांनी हे वक्तव्य केले आहे. एवढेच नाही, तर चीन सातत्याने पश्चिमेकडील देशांनी तयार केलेल्या लशींसंदर्भात संशय निर्माण करण्याचा प्रयत्नही करत आहे. तत्पूर्वी, ब्राझीलच्या वैज्ञानिकांनी चिनी लस निर्माता कंपनी सिनोव्हॅकची कोरोना विरोधी लस 50.4 टक्के प्रभावी असल्याचे म्हटले होते. तेव्हाही चिनी लशीवर प्रश्न उपस्थित झाले होते.

चिनी लशीच्या तुलनेत फायझरने तयार केलेली लस 97 टक्के प्रभावी आहे. गाओ यांनी लशीच्या निर्मितीत एमआरएनए तत्रज्ञानाचाही उल्लेख केला. या तंत्राचा वापर पश्चिमेकडील देशातील लस निर्माता करतात. या उलट चिनी लस निर्माते  पारंपरिक पद्धतीवरच विश्वास ठेवता. गाओ म्हणाले, आपण एमआरएनए तत्राच्या फायद्यावर विचार करायला हवा. हे डोस मानव जातीसाठी लाभदायक ठरू शकतात. आपणही हे तंत्र अवलंबायला हवे.

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही घातक; माणूस राहिला तरच आस्था टिकेल; रमजानवर योगी म्हणाले...

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन