शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

चिनी अब्जाधीशानं दिली २६ वेळा परीक्षा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 08:55 IST

चीनचे अब्जाधीश उद्योगपती लियांग शी यांचं यासंदर्भात काय म्हणणं आहे, हे जाणून घेणंही अतिशय महत्त्वाचं आहे.

पैशाची किंमत मोठी की ज्ञानाची, विद्येची किंमत मोठी? दोघांपैकी कोण श्रेष्ठ, हा प्रश्न कायमच विचारला जातो. काही जण म्हणतात, भले तुम्ही ज्ञानवंत, विचारवंत असाल, पण नुसत्या ज्ञानानं कामं होत नाहीत. 'बाजारात' त्याला काही किंमत नाही आणि कोणी विचारत नाही, पण ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्या घरात कुबेर पाणी भरतो, त्याला सारे सलाम करतात, त्याचा शब्द कायमच मोठा मानला जातो...

पण चीनचे अब्जाधीश उद्योगपती लियांग शी यांचं यासंदर्भात काय म्हणणं आहे, हे जाणून घेणंही अतिशय महत्त्वाचं आहे. लियांग यांच्या जीवनाचा प्रवास खूपच संघर्षपूर्ण राहिला आहे. लहानपणापासूनच त्यांना परिस्थितीशी झुंज द्यावी लागली. जगण्यासाठीचा त्यांचा झगडाही खूपच मोठा होता. गरिबीमुळे पोटापाण्यासाठी लहानपणीच त्यांना कामधंद्याच्या शोधासाठी वणवण करीत हिंडावं लागलं. एका फॅक्टरीमध्ये त्यांना कशीबशी नोकरी मिळाली. पण वर्षभरातच या फॅक्टरीचं दिवाळं निघालं. त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या, पण त्यांचं बस्तान काही बसलं नाही. त्यानंतर उधार उसनवारी करून १९९० मध्ये त्यांनी लाकडाचा ठोक व्यापार सुरू केला. इथे मात्र त्यांच्या नशिबानं त्यांना चांगलाच हात दिला. अर्थात यात त्यांच्या कष्टाचा आणि मेहनतीचा वाटाही खूपच मोठा होता. 

वर्षभरातच त्यांनी दहा लाख युआनची कमाई केली. आपला व्यवसाय अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. प्रचंड पैसा कमावला. थोड्याच कालावधीत चीनमधील श्रीमंतांच्या यादीत त्यांचं नाव झळकायला लागलं. अब्जावधी डॉलर्सची संपत्ती कमावली, पण त्याचवेळी त्यांनी समाजभानही कायम राखलं. लोकांच्या मदतीसाठी त्यांचा हात सतत पुढेच असायचा. त्यामुळे त्यांना कायमच लोकांकडून आदर-सत्कार आणि मान-सन्मानही मिळाला. पण एक गोष्ट मात्र त्यांच्या मनाला कायम खात होती... पैसा तर आपण मनःपूत कमावला, पण कॉलेजची पदवी मात्र आपल्याकडे नाही. कितीही कष्ट घ्यावे लागले तरी चालतील, पण कॉलेजची पदवी आपल्याला मिळालीच पाहिजे, असा चंगच त्यांनी बांधला.

वयाच्या सोळाव्या वर्षी, १९८३ मध्ये पहिल्यांदा त्यांनी कॉलेज प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा दिली. १९९२ पर्यंत दरवर्षी ते कुठे ना कुठे नोकरी करीत होते. त्यातून जसा वेळ मिळेल तसा अभ्यासही करीत होते. पण दरवर्षी परीक्षा देऊनही ते पास होऊ शकले नाहीत. १९९२ साली तर वयाची मर्यादा संपल्यामुळे ही परीक्षा पास होण्याचं त्यांचं स्वप्नही भंग झालं. आपण आता कॉलेजला जाऊ शकत नाही, त्यामुळे ते खूपच निराश झाले. चीनमधील कॉलेज प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षेला 'गाओकाओ' असं म्हटलं जातं. ही परीक्षा बरीच कठीणही मानली जाते. दरवर्षी साधारण साठ टक्क्यांच्या आसपास मुलं या परीक्षेत नापास होतात.

लियांग यांच्या सुदैवानं चीन सरकारनं २००१ मध्ये या परीक्षेसाठी असलेली वयाची मर्यादा उठवली. लियांग यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. आपल्या नावासमोर 'ग्रॅज्युएट'चा शिक्का असायलाच पाहिजे, म्हणून त्यांनी परत परीक्षा द्यायला आणि अभ्यासाला सुरुवात केली. दैनंदिन व्यायाम, खेळ, इतर काही महत्त्वाच्या गोष्टीही त्यांनी बाजूला सारल्या आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. काही महिने साऱ्याच गोष्टींपासून त्यांनी स्वतःला अलिप्त केलं आणि चक्क एखाद्या तपस्वी भिक्षुसारखं जीवन जगायला सुरुवात केली. दिवसातले बारा-बारा तास पास होण्याआधी मेलो, तर...रिझल्ट पाहिल्यावर यावेळी प्रथमच लियांग यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पुढच्या वर्षी मी परत ही परीक्षा देईन की नाही, हे मला माहीत नाही, पण गाओकाओ परीक्षा उत्तीर्ण होण्याआधीच मरणं म्हणजे तुमचं आयुष्यच अधुरं असण्यासारखं आहे. ही परीक्षा पास होण्यासाठीचे प्रयत्न जर मी सोडले, तर यापुढचं माझं आयुष्य आणि रोज जो चहा मी पितो, जे अन्न मी खोतो, ते सारंच माझ्यासाठी कडवट होऊन जाईल! काय करावं? -मी खरंच सुन्न झालो आहे! अभ्यास केला!

युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळावा, यासाठी किती वेळा त्यांनी प्रवेश परीक्षा द्यावी? तब्बल २६ वेळा त्यांनी या . परीक्षेसाठी नशीब अजमावलं, पण दुर्दैवानं प्रत्येक वेळी त्यात त्यांना अपयशच आलं. काही दिवसांपूर्वीच यंदाच्या परीक्षेचा निकाल लागला. आपल्याला परीक्षेत किती मार्क्स पडतील, आपण पास होऊ की नाही, याबद्दल एखाद्या तरुण विद्यार्थ्याच्या मनात जी धाकधूक आणि उत्सुकता असते, तशीच धाकधूक त्यांच्याही मनात होती. मोठ्या आशेनं त्यांनी आपला रिझल्ट पाहिला, पण यावेळीही ना पा स! हा रिझल्ट पाहिल्यावर आपलं हृदय आता बंद पडेल की काय, असं लियांग यांना वाटलं आणि ते खूपच निराश झाले. स्वतःच्या क्षमतेवरच त्यांना आता शंका वाटायला लागली आहे..

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीchinaचीन