शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलमध्ये चिनी राजदूताचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला; जगभरात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 15:33 IST

इस्रायली यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू; मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

जेरुसलेम: इस्रायलमध्येचीनच्या राजदूताचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चीनचे राजदूत डू वेई यांचा मृतदेह त्यांच्या हर्टजलियामधील निवासस्थानात सापडला. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामुळे जगभरात एकच खळबळ माजली आहे. इस्रायलमध्ये सरकारच्या शपथविधीच्या घडामोडींना वेग आला असताना राजदूत डू वेई यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. सध्या पोलिसांकडून वेई यांच्या घराची तपासणी सुरू आहे. चीनच्या दुतावासानं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायलमधल्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, डू वेई यांच्या घरात हल्ल्याचे कोणतीही पुरावे आढळून आलेले नाहीत. वेई यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असावा, असा प्राथमिक अंदाज प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकातल्या काही अधिकाऱ्यांनी वर्तवला. मात्र अद्याप तरी वेई यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. ५७ वर्षांच्या डू वेई यांचा मृतदेह त्यांच्या बेडवर आढळून आला. झोपेतच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वेई यांच्यामागे पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांनी इस्रायलमधील चीनचे दूत म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. इस्रायलमध्ये सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या घडामोडी सुरू असताना वेई यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. गेल्या काही दिवसांपासून इस्रायलमध्ये सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं राजकीय बैठकांचं सत्र सुरू होतं. अखेर आज बेंजामिन नेतन्याहू इस्रायलचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. ते पाचव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान होणार आहेत. राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णयजाणून घ्या, महाराष्ट्रातील लॉकडाऊन 4.0मध्ये काय सुरू अन् काय बंद?मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाणार ५० लाखांचा विमा; केंद्र सरकारची मोठी घोषणा

टॅग्स :Israelइस्रायलchinaचीन