शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

चीनची वर्ल्डक्लास आर्मी ठरणार भारतासह शेजारी देशांसाठी धोका? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 17:15 IST

चीनच्या लष्कराला 2050 पर्यंत वर्ल्ड क्लास बनवण्याची घोषणा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केली होती. चीनच्या या आक्रमक धोरणामुळे भारतासह चीनच्या अन्य शेजारील देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

बीजिंग - चीनच्या लष्कराला 2050 पर्यंत वर्ल्ड क्लास बनवण्याची घोषणा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केली होती. चीनच्या या आक्रमक धोरणामुळे भारतासह चीनच्या अन्य शेजारील देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र चीनच्या वाढल्या सैनिकी महत्त्वाकांक्षांमुळे सध्यातरी कोणताही धोका नसल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. लढाऊ विमाने, जहाज, अत्याधुनिक हत्यारांची खरेदी आणि निर्मिती यामुळे चीनचे संरक्षण बजेट गेल्या 30 वर्षांमध्ये वेगाने वाढले आहे. मात्र चीनचा संरक्षणावरील खर्च अमेरिकेपेक्षा तीन पटीने कमी आहे. पण असे असले तरी चीनने अमेरिकेला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मागच्या महिन्यात चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पंचवार्षिक काँग्रेसमध्ये साडेतीन तासांचे भाषण केले. यावेळी त्यांनी सन २०१२ मध्ये पक्ष व सरकारची धुरा स्वीकारल्यापासून केलेल्या कामाचा अहवाल सादर करतानाच शी जिनपिंग यांनी २०५० पर्यंत चीनला महान समाजवादी राष्ट्र बनविण्याचा संकल्पही जाहीर केला.बीजिंगमधील हे अधिवेशन जागतिक प्रसारमाध्यमांना खुले नव्हते. एकपक्षीय सत्ता असलेल्या चीनमध्ये पक्ष व सरकारप्रमुख म्हणून एकाच व्यक्तीकडे ठेवण्याची परंपरा आहे.  युद्ध कसे जिंकता येईल त्यावर लक्ष द्या तसेच लष्कराच्या अत्याधुनिकीकरणावर (मॉर्डनायझेशन) भर देण्यास सांगितले. 2050 पर्यंत जगातील शक्तीशाली, सर्वोत्तम लष्कर उभे करण्याचा संकल्प जिनपिंग यांनी यावेळी बोलून दाखवला. या बैठकीच्यावेळी शी जिनपिंग लष्करी गणवेशात होते. त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना पक्षासोबत पूर्णपणे एकनिष्ठ रहाण्याचा आदेश दिला. 2035 पर्यंत चिनी लष्कराची मॉर्डनायझेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. भविष्यात चीन समोर अमेरिकेच्याबरोबरीने भारताचेही आव्हान असेल. दोन महिन्यांपूर्वी डोकलामच्या मुद्यावरुन चीन आणि भारताचे लष्कर समोरासमोर उभे होते. यावेळी चीनकडून दादागिरीचा भरपूर प्रयत्न झाला. सरकारी मालकीच्या वृत्तपत्रातून भारताला भरपूर धमक्या देण्यात आल्या. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. भारचाने ना युद्धाची भाषा केली, ना आपले सैन्य मागे घेतले. भारताच्या या खंबीर भूमिकेमुळे अखेर चीनला माघार घ्यावी लागली. भारताबरोबर आपल्याला युद्ध परवडू शकत नाही हे चीनच्या कळून चुकले आहे तसेच दक्षिण चीन समुद्रातही चीनसमोर अनेक देशांचे आव्हान आहे. त्यामुळे चीनने आपल्या लष्कराच्या अत्याधुनिकीकरणावर जोर दिला आहे. 

टॅग्स :chinaचीन