चीनचे बुडालेले जहाज अवजड क्रेन्सच्या मदतीने पाण्याबाहेर, मृतांची संख्या १00
By Admin | Updated: June 6, 2015 00:11 IST2015-06-06T00:11:26+5:302015-06-06T00:11:26+5:30
यांग्तेझ नदीत बुडालेल्या जहाजाला चिनी बचाव पथकांनी मोठ्या क्रेन्सच्या मदतीने शुक्रवारी पाण्याबाहेर काढले. दरम्यान, दुर्घटनेतील बळींची संख्या वाढून १00 झाली आहे.

चीनचे बुडालेले जहाज अवजड क्रेन्सच्या मदतीने पाण्याबाहेर, मृतांची संख्या १00
४यांग्तेझ नदीत बुडालेल्या जहाजाला चिनी बचाव पथकांनी मोठ्या क्रेन्सच्या मदतीने शुक्रवारी पाण्याबाहेर काढले. दरम्यान, दुर्घटनेतील बळींची संख्या वाढून १00 झाली आहे. सोमवारी बुडालेल्या या जहाजात ४५६ प्रवासी होते. ईस्टर्न स्टार नावाच्या या २,२०० टन वजनी जहाजाला अवजड क्रेन्सच्या मदतीने नदीबाहेर काढतानाचे फुटेज सरकारी टीव्हीवर दाखविण्यात आले.
४ या चार मजली जहाजाच्या एका भागाची प्रचंड हानी झाली आहे. प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी जहाजात जाण्याची बचाव कर्मचाऱ्यांची योजना आहे. बुडालेल्या जहाजाला पाण्याबाहेर काढण्याचे काम रात्री ८ वाजता सुरू झाले. संपूर्ण जहाजाला उचलून सरळ ठेवण्याची क्षमता असलेल्या अवजड क्रेन्सच्या मदतीने जहाजाला पाण्याबाहेर काढण्यात आले. यांग्तेझ नदीद्वारे ११ दिवसांच्या सफरीवर निघालेल्या या जहाजावर बहुतांश वयस्कर पर्यटक होते.
४सोमवारी रात्री मध्य चीनच्या हुबई प्रांतातील जियान्ली येथे शक्तिशाली चक्रीवादळामुळे हे जहाज उलटले होते. जहाजावरील लोकांपैकी केवळ १४ लोकच बचावले आहेत. त्यावरून मृतांची संख्या ४४२ चा आकडा पार करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनमधील गेल्या ७० वर्षांतील सर्वांत भयंकर जल दुर्घटना म्हणून या दुर्घटनेकडे पाहिले जात आहे.