शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

चीनची ऎतिहासिक सैन्यकपात, हा आहे ड्रॅगनचा नवा प्लॅन

By admin | Updated: July 12, 2017 17:07 IST

जगातील सर्वात मोठी सैन्यांची फौज असणाऱ्या चीननं आपले सैन्य कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 1980 पर्यंत सैनिकांची संख्या 45 लाख होती

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 12 - जगातील सर्वात मोठी सैन्यांची फौज असणाऱ्या चीननं आपले सैन्य कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 1980 पर्यंत सैनिकांची संख्या 45 लाख होती. 1985 मध्ये ही संख्या 30 लाखांवर आणण्यात आली. आता ती 23 लाखांवर आली आहे. 23 लाखांचे विशाल सैन्य असलेल्या चीननं 13 लाखांपेक्षा अधिक सैनिकांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या पीएलए डेलीने याबद्दलचे वृत्त दिले आहे. पीएलए डेलीने दिलेल्या वृत्तानुसार चीन सरकारने आपली सैन्यक्षमता 10 लाखांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. चीन सरकारने आपल्या सैन्यांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या सैन्यांची संख्या कमी करुन स्ट्रॅटजिक सपोर्ट फोर्स, नौदल, रॉकेट फोर्समधील सैन्याचे प्रमाण वाढवले जाणार आहे. तर चिनी हवाई दलातील सैनिकांची संख्या पूर्वी इतकीच ठेवण्यात आली आहे. सोशल साईट असलेल्या वी चॅटवर पीएलए डेली वृत्तपत्राचे खाते असलेल्या जुन झेंगपिंग स्टुडिओवर सैन्याने ढाचा सुधारण्यासंदर्भात एक लेख लिहिला आहे. सुधारणांनंतर विशाल सैन्य क्षमता असलेल्या ढाच्यात बदल करण्यात येतील. चीनच्या सामारिक गरजा लक्षात घेऊन सैन्याच्या ढाच्यात बदल केले जाणार आहेत, असे लेखात म्हटले आहे. याआधी चीनकडून जमिनीवर केले जाणारे युद्ध आणि अंतर्गत सुरक्षा या मुद्यांकडे लक्ष केंद्रीत केले जात होते. मात्र आता यामध्ये मुलभूत बदल केले जाणार असल्याचे या लेखात म्हटले आहे.

याआधी 2015 मध्ये तीन लाखांनी सैन्यांची कपात करण्यात येणार असल्याची घोषणा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी केली होती. चिनी संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2013 मध्ये सैन्यात 8.50 लाख युद्ध सैनिक होते. मात्र सध्या चिनी सैन्याचा नेमका आकडा किती, याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही.