चीनमध्ये पहिली सोलर कार धावणार
By Admin | Updated: July 4, 2016 20:57 IST2016-07-04T19:53:58+5:302016-07-04T20:57:58+5:30
चीनमध्ये आघाडीवर असलेल्या हेनर्जी होल्डिंग ग्रुपनं सौरऊर्जेवर आधारित चार सोलर कार बनवल्या आहेत.

चीनमध्ये पहिली सोलर कार धावणार
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 4- टेक्नॉलॉजीच्या बाबतीत चीन नेहमीच एक पाऊल पुढे असतो. चीनमध्ये आघाडीवर असलेल्या हेनर्जी होल्डिंग ग्रुपनं सौरऊर्जेवर आधारित चार सोलर कार बनवल्या आहेत. या सोलर कारमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीची सिस्टम बसवण्यात आली आहे. ही कार पूर्णतः सौरऊर्जेवर चालणार आहे. सौरऊर्जेवरील आधारित कार चालवताना ती सूर्यप्रकाशावर चार्ज होणार आहे.
या कारमध्ये लिथियम बॅटरीही बसवण्यात आली आहे. ही बॅटरी कोणत्याही स्टेशनवर चार्ज करता येणार आहे. जेव्हा सूर्यप्रकाश नाहीसा होईल त्यावेळी ही कार बॅटरीच्या आधारे लांब पल्ल्याचं अंतरही सहज कापणार आहे. हेनर्जी कंपनीनं बिंकी फोटॉन या कंपनीशी सौरऊर्जेवर चालणा-या बस तयार करण्यासाठी करार केला आहे.
या कारची बॅटरी 5 ते 6 तास पूर्ण चार्ज केल्यानंतर ही 80 किलोमीटरपर्यंतच अंतर सहजगत्या पार करणार आहे. कारमध्ये अल्टा डिव्हाइसची टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. या कारच्या बुकिंगसाठी सध्या चीनमध्ये अनेकांच्या उड्या पडत आहेत. लवकरच ही कार चीनच्या रस्त्यांवर धावताना पाहायला मिळणार आहे.