माकडाने दगड मारल्याने चीनमधील उद्योजकाचा झाला मृत्यू
By Admin | Updated: April 26, 2016 13:29 IST2016-04-26T13:27:31+5:302016-04-26T13:29:04+5:30
नेचर पार्कमध्ये फिरताना माकडाने ढकललेला दगड लागून गंभीर जखमी झालेल्या प्रसिद्ध उद्योगपतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चीनमध्ये घडली

माकडाने दगड मारल्याने चीनमधील उद्योजकाचा झाला मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. २६ - नेचर पार्कमध्ये फिरताना माकडाने ढकललेला दगड लागून गंभीर जखमी झालेल्या प्रसिद्ध उद्योगपतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चीनमध्ये घडली आहे. 'व्हाईट रॅबीट क्रीमी कँडी' ही प्रसिद्ध कँडी बाजारात आणणा-या ' ग्वान शेंग युआन को.लिमिटेड' या शांघाय फूड कंपनीचे माजी चेअरमन वेंग माओ यांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला.
६७ वर्षीय वेंग माओ हे शांघाय येल्व ट्रॅव्हल एजन्सीच्या फोटोशूटसाठी हेनान येथील युन्ताई पर्वतरांगातील नेचर पार्कमध्ये गेले होते. तेथे फिरतानाच एका माकडाने ढकललेला मोठा दगड गडगडत खाली आल्याने वेंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उरचार सुरू होते, मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली व गेल्या आठवड्यात त्यांचे निधन झाले.
वेंग यांच्या कंपनीने १९४० साली बाजारात आणलेली मिल्क कँडी अतिशय प्रसिद्ध होती.