शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावा, १४ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम 
2
जागोजागी कमांडो, ५०० CCTV...; नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी दिल्लीत चोख सुरक्षा
3
Video : एका खेळाडूवर अवलंबून नाही! IND vs PAK लढतीपूर्वी विराटच्या प्रश्नावर Rohit Sharmaचं उत्तर
4
पंकजाताई निवडून नाही आल्या तर...; व्हायरल व्हिडिओतील युवकाचा मृतदेह आढळला 
5
निकालानंतर 'या' शहरातील लोकांची चांदी; जमिनीच्या भावात तब्बल ५०-१०० टक्क्यांनी वाढ
6
३ धावांवर ३ विकेट्स! Quinton de Kock 'डायमंड डक' ठरला, आफ्रिकेचा डाव गडगडला, Video 
7
रेसकोर्सची जमीन हडपण्याचा प्रयत्न थांबवा; आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र
8
"NDA सरकार पडणार", PM मोदींच्या शपथविधीपूर्वी ममता बॅनर्जींचे मोठे भाकीत
9
रोहित शर्माला पुन्हा दुखापत, संजना गणेसनची पोस्ट अन् जसप्रीत बुमराह नेतृत्व करण्याची चर्चा
10
Sonia Gandhi : सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, खरगे यांचा प्रस्ताव मंजूर
11
दक्षिण आफ्रिकेने फास आवळला, नेदरलँड्सचा संघ कसाबसा शतकपार पोहोचला
12
Monsoon Update : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! मान्सून काही तासांत मुंबईत धडकणार
13
राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक फलक काेसळला; दुचाकीस्वार ठार 
14
...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश
15
"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
16
रोहित, विराट यांना मित्रच समज...! शाहीन आफ्रिदीला भारतीय चाहत्यांना प्रेमळ सल्ला, Video 
17
SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..."
18
चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!
19
Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या
20
'भिंतीवरचं पेंटिंग मिटवशील पण सत्य...?', दलजीत कौरने पुन्हा पतीवर साधला निशाणा

China's Corona Vaccine Leukaemia: मोठी बातमी! चिनी कोरोना लसीमुळे लोकांना ल्युकेमियाचा जडला रोग; गुप्त अहवालाने जग हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 11:42 AM

China's Corona Vaccine Side effects: नोव्हेंबर २०२१ च्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनने जगभरात कोविड लसींचे १.५ अब्जाहून अधिक डोस निर्यात केले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.  

कोरोनाच्या उत्पत्तीनंतर चीन पुन्हा एकदा वादात सापडला आहे. कोरोनामुळे जगभरात नाचक्की झालल्या चीनच्या कोरोना लसीमुळे नागरिकांना ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) होत असल्याचा गुप्त अहवाल चीनच्याच राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिल्याने खळबळ उडाली आहे. या अहवालाची कागदपत्रे बाहेर पडल्य़ाने चीनची लस देखील किती धोकादायक होती हे समोर आले आहे. 

शी जिनपिंग यांच्यासाठी यापेक्षा मोठी लाजीरवाणी गोष्ट कोणती असू शकत नाही. अनेकांना चिनी कोरोना लसीमुळे ल्युकेमिया झाला होता, असे या अहवालात म्हटले आहे. एनएचसीने चीनच्या अधिकाऱ्यांना अनेक लस घेतलेले नागरिक ल्युकेमिया झाल्याच्या तक्रारी करत असल्याचे सांगत सतर्क केले होते. NHC ची प्रत हेबेई, लिओनिंग, सिचुआन, शांक्सी आणि इतरांसह 18 प्रांतांना पाठवण्यात आली आहे, असे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे.

ल्य़ुकेमियाने ग्रस्त झालेली कुटुंबे वुई चॅटवरून आपला अनुभव शेअर करत आहेत. चीन नॅशनल हेल्थ कमिशनच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या लोकांचा आवाज दाबण्यासाठी CCP ने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. चीनने या लशी परदेशांनाही मोठ्या प्रमाणावर पुरविल्याने खळबळ उडाली आहे. या देशांमधील लोकांनाही हा गंभीर साईड इफेक्ट जाणवण्याची शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सिनोफार्म लस आणि सिनोव्हाक-कोरोनाव्हॅक कोविड-19 लसी आपत्कालीन वापरासाठी प्रमाणित केल्या होत्या. या दोन्ही लसी चिनी औषध कंपन्यांनी विकसित केल्या आहेत. नोव्हेंबर २०२१ च्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनने जगभरात कोविड लसींचे १.५ अब्जाहून अधिक डोस निर्यात केले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन