शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

डोकलाम विवादानंतर चीनने तिबेटमध्ये प्रथमच केला युद्धसराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 17:28 IST

डोकलाम येथील विवादानंतर प्रथमच चीनने तिबेटमधील हिमालयीन क्षेत्रात युद्धसराव केला आहे.

बीजिंग -  गतवर्षी भारत आणि चीनचे सैन्य डोकलामच्य पठारावर आमनेसामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, डोकलाम येथील विवादानंतर प्रथमच चीनने तिबेटमधील हिमालयीन क्षेत्रात युद्धसराव केला आहे. चिनी सैन्याने हिमालयातील दुर्गम भागात सामान आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक, तसेच सैनिकी आणि असैनिकी मनुष्यबळाचे एकत्रीकरण  करण्याचा सराव यादरम्यान करण्याच आल्याचे चीनमधील अधिकृत प्रसारमाध्यमांनी सांगितले.  चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यामध्ये अभ्यासकांनी चिनी सैन्याने मंगळवारी केलेल्या सरावाचे कौतुक केले आहे. तसेच  सैनिकी आणि असैनिकी मनुष्यबळाची करण्यात आलेली जमवाजमव हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हटले आहे. तसेच हा सराव म्हणजे नव्या युगामध्ये सशक्त सेना निर्माण करण्याचे लक्ष्य गाठण्याची रणनीती असल्याचे चिनी तज्ज्ञांनी म्हटले आहे.  तिबेटमध्ये हा युद्धसराव स्थानिक कंपन्या आणि सरकारच्या मदतीने करण्यात आला. या सरावाचा मुख्य उद्देश हा सैनिकी आणि असैनिकी मनुष्यबळाचे एकत्रिकरण करण्याच्या रणनीतीची अंमलबजावणी करणे हा होता. तिबेटच्या पठारावर वातावरण आणि भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल आहे. त्यामुळे येथील सैनिकांना दीर्घकाळ सामान आणि हत्यारांचा पुरवठा करणे कठीण ठरते.   प्रतिकूल परिस्थितीत सैनिकांना तग धरून राहण्यास तयार करणे, साधनसामुग्रीचा पुरवठा, बचावकार्य, आपातकालीन देखरेख, रस्त्यांच्या सुरक्षेमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी चिनी सैन्याने सैनिकी आणि असैनिकी एकत्रिकरणाची रणनीती अवलंबली आहे, असे चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हूआने कमांड लॉजिस्टिक सपोर्ट डिपार्टमेंटचे प्रमुख झांग वेनलोंग यांच्या हवाल्याने सांगितले आहे.  

टॅग्स :chinaचीनDoklamडोकलामnewsबातम्याIndiaभारतIndian Armyभारतीय जवान