शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधील २०० अमेरिकी कंपन्या येणार भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 06:19 IST

रोजगार निर्मिती : निवडणुकीनंतर कंपन्या स्थलांतरित करण्याची तयारी

वॉशिंग्टन : अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरू असताना चीनसाठी एक नकारात्मक वृत्त आहे. अमेरिकेतील जवळपास २०० कंपन्या लोकसभा निवडणुकीनंतर आपले प्रकल्प चीनमधून भारतात स्थलांतरित करणार आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करू पाहणाऱ्या यूएस- इंडिया स्ट्रॅटेजिक अ‍ॅण्ड पार्टनरशिप फोरमने ही माहिती दिली आहे.

या स्वयंसेवी समूहाने म्हटले आहे की, चीनऐवजी अन्य पर्याय शोधू पाहणाऱ्या या कंपन्यांसाठी भारत एक शानदार पर्याय आहे. या समूहाचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी सांगितले की, अनेक कंपन्या आमच्याशी चर्चा करीत आहेत आणि विचारत आहेत की, भारतात गुंतवणूक करून कशाप्रकारे चीनला पर्याय शोधला जाऊ शकतो. निवडणुकानंतर भारतात स्थापन होणाऱ्या नव्या सरकारला हा समूह सुधारणांबाबतचा सल्ला देणार आहे. मुकेश अघी सांगितले की, भारत- अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापाराचे आम्ही समर्थन करतो.नव्या सरकारने सुधारणांना गती द्यावी

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नव्या सरकारने काय करायला हवे? असा प्रश्न केला असता मुकेश अघी यांनी सांगितले की, सरकारने सुधारणांची गती वाढवायला हवी. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणायला हवी. अधिक पक्षांसोबत चर्चा करण्यावर भर द्यायला हवा. यामुळे मोठ्या देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.

चीनला दे धक्काचीनमधील २०० हून अधिक अमेरिकी कंपन्या भारतात येण्याचा विचार करत असल्याने चीनला हा मोठा दणका मानला जात आहे. यातून भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते.

अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि भारतीय मनुष्यबळ यांच्या एकत्रीकरणातून आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या अमेरिकन कंपन्यांना कशा प्रकारे आकर्षित करायचे याचा सरकारने विचार करावा. यासाठी भूसंपादनापासून ते परवानगी आणि कर आदी बाबींमध्ये सुटसुटीतपणा आणावा लागेल.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतAmericaअमेरिका