शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
3
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
4
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
5
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
6
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
7
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
8
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
9
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
10
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
11
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
12
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
13
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
14
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
15
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
16
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
17
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
18
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
19
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
20
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा

चीनविरोधात आठ देशांनी केली एकी; अमेरिकेच्या पाठिंब्यानं उघडली आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 23:02 IST

जागतिक व्यापार, संरक्षण आणि मानवाधिकारांचा चीनकडून होत असलेल्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

वॉशिंग्टनः कोरोनाचा फैलाव जगभरात  झाला असून, अनेक देश यासाठी चीनला जबाबदार धरत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांनीही चीनविरोधात उघड भूमिका घेतली आहे. चीनचा दक्षिण चिनी समुद्रातील आक्रमक पवित्र्यामुळेही तो अमेरिकेच्या रडारवर आहे. विशेष म्हणजे चीन अशा परिस्थितही भारताविरोधात कुरापती करत आहे. आता चीनला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेसह आठ देशांच्या वरिष्ठ खासदारांची एक आघाडी उघडण्यात आली आहे. जागतिक व्यापार, संरक्षण आणि मानवाधिकारांचा चीनकडून होत असलेल्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इंटर-पार्लामेंटरी अलायंस ऑन चायनाची (IPAC)ची निर्मिती करण्यात आली आहे. चीनशी संबंधित मुद्द्यांबाबत कृतीशील आणि रणनीतिकदृष्ट्या भूमिका ठरवून कृती करण्यासाठी आयपीएसीची स्थापना करण्यात आली आहे. अमेरिका, जर्मनी, ब्रिटेन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वीडन, नॉर्वे आणि यूरोपच्या संसदेचे सदस्य या संघटनेत सहभागी आहेत. या संघटनेत अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर मार्को रुबिओ आणि डेमोक्रॅटचे बॉब मेनेंडेझ, जपानचे माजी परराष्ट्रमंत्री जेन नाकातानी, युरोपियन संसदेत परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य मिरियम लेक्झमन आणि ब्रिटनमधील कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार इयान डंकन स्मिथ यांचा समावेश आहे. याखेरीज जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वीडन आणि नॉर्वेमधील नेतेही या संघटनेत आहेत. ज्या देशांच्या खासदारां(सिनेटर)चा या संघटनेत समावेश आहे, त्यापैकी बर्‍याच देशांना चीनच्या महत्त्वाकांक्षेमुळे राजकीय आणि आर्थिक परिणाम भोगावे लागले आहेत. जेव्हा चीनच्या हुवेई टेक्नॉलॉजी कंपनीच्या कार्यकारिणीला कॅनडामध्ये अटक करण्यात आली, तेव्हा चीनने दोन कॅनेडियन नागरिकांना कारणाशिवाय ताब्यात घेतले होते. नॉर्वे आणि चीनचे 6 वर्ष जुने व्यावसायिक संबंध आहेत. जेव्हा नॉर्वेने चिनी सरकारच्या टीकाकारांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान केला, तेव्हा चीनने हळूहळू त्याच्याशी व्यापार कमी केला. कोरोनाच्या साथीसाठी ऑस्ट्रेलियाने चीनला दोष दिला, तेव्हा चीनने ऑस्ट्रेलियन वस्तूंवर नवीन कर लादले. चीनमध्ये या निर्णयाची तुलना १९००च्या दशकातील ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, इटली आणि ऑस्ट्रिया-हंगेरी या ८ नेशन अलायन्सशी केली जात आहे. 

हेही वाचाविकृतीचा कळस! लहान मुलासमोरच मित्रांसोबत मिळून पतीनं केला पत्नीवर सामूहिक बलात्कार

CoronaVirus News: धोका वाढला! राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८२ हजारांच्या पुढे, १२० रुग्णांचा मृत्यू

शिवाजी महाराजांच्या कारभाराचा जगापुढे आदर्श, हा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध- उद्धव ठाकरे

कोरोनाच्या संक्रमणात रक्तगटाचीही महत्त्वाची भूमिका; 'या' लोकांना जास्त धोका

'त्या चीनविरोधी जाहिरातीमुळे ट्विटरकडून अमूलचं हँडल ब्लॉक?

देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सोडला उद्धव ठाकरेंवर 'बाण', आता केल्या 5 प्रमुख मागण्या

सोन्याचे भाव गडगडले, चांदीच्या दरातही मोठी कपात, जाणून घ्या...

चीनला मात द्यायची असल्यास त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला, बाबा रामदेव यांचं आवाहन

टॅग्स :chinaचीन