शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"विद्यार्थ्यांना जिनपिंग यांच्या विचारांचे धडे द्या," चीनमधील शाळांना अजब आदेश

By जयदीप दाभोळकर | Updated: February 4, 2021 17:27 IST

चीनच्या ग्लोबल टाईम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या गाईडलाईन्स

ठळक मुद्देचीनच्या ग्लोबल टाईम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या गाईडलाईन्सजिनपिंग यांचे विचार विद्यार्थ्यांना शाळेत शिकवण्याचे देण्यात आलेत आदेश

अनिश्चित काळासाठी सत्ता काबिज केलेले चीनचेराष्ट्राध्यक्ष आता विद्यार्थ्यांच्या मंदूवरही शासन करण्याच्या विचारात आहे. कमी वयातच विद्यार्थ्यांच्या मनात त्यांचे विचार बिंबवून विद्यार्थ्यांच्या नजरेत महान बनण्याचं काम त्यांनी आता सुरू केलं आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या १०० व्या वर्धापन दिनापूर्वीच चीनमध्ये यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. पक्षाच्या सेंट्रल कमिटीनं बुधवारी यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.सेंट्रल कमिटीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वैचारिक शिक्षणावर जोर देण्यास सांगण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पहिले दोन वर्ष विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी. जिनपिंग यांच्या विचारांचे धडे देण्यात यावेत. तसंच विद्यार्थ्यांना क्षी जिनपिंग यांच्या आदेशाचं पालन करण्याची शिकवण देण्यात यावी आणि त्यांनीदेखील तेच केलं पाहिजे जे आपले राष्ट्राध्यक्ष सांगतील, असं या गाईडलाईन्समध्ये नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, चीनमधील अधिकाऱ्यांसह लेखकांवरही आपल्या धोरणांमध्ये जिनपिंग यांच्या विचारांना आणि त्यांच्या सिद्धांतांना सामील करण्याचा दबाव आणला जात असल्याचं समोर आहे. तर दुसरीकडे जिनपिंग दे स्वत:ला सर्वोच्च नेते म्हणून सिद्ध करण्यास तसंच देशातील आपलं नियंत्र अधिक मजबूत करण्याचा प्रयत्नही करत आहे. 'आज आपलं सुखी जीवन हे पक्षाचं नेतृत्व आणि समाजवादामुळेच आहे हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावं,' असंही यात सांगण्यात आले. चीन सरकारचं वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्समध्ये यासंदर्भातील गाईडलाईन्स प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसंच विद्यार्थ्यांचं राजकीय ज्ञान आणि मूल्यांना मजबूत करण्याचं रणनितिक महत्त्वा आणि हे विचार एका पीढीतून दुसऱ्या पीढीतही जातील, असं या गाईडलाईन्ससोबत लिहिण्यात आलं होतं.आणखी एक सरकारी वृत्तपत्र चायना डेलीनंदेखील सरकारच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तसंच लहान मुलं हे देश आणि पक्षाचं भविष्य आहेत आणि त्यासाठीच त्यांचा विकास रणनितिक महत्त्व प्राप्त करतो असं चायना डेलीनं म्हटलं आहे. 

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंगPresidentराष्ट्राध्यक्षSchoolशाळाStudentविद्यार्थी