शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

India-China: कुख्यात पाकिस्तानी दहशतवाद्याला चीनचे समर्थन, UNमध्ये भारताच्या प्रस्तावाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 18:21 IST

India-China: भारताच्या दहशतवादाविरोधातील लढाईत चीनने पुन्हा एकदा अडथळा आणला आहे.

नवी दिल्ली/न्यूयॉर्क:भारताच्या दहशतवादाविरोधातील लढाईत चीनने पुन्हा एकदा अडथळा आणला आहे. बुधवारी चीनने पाकिस्तान-आधारित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रौफ अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून सूचीबद्ध करण्यापासून रोखले. भारत आणि अमेरिकेने अझहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी यादीत समावेश करावा, असा प्रस्ताव ठेवला होता. अझहरचा 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणात सहभाग होता.

रौफ अझहर मसूद अझहरचा भाऊभारत-अमेरिकेने दोन आठवड्यांपूर्वी अब्दुल रऊफ अझहरला दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिला होता. अब्दुल रौफ अझहर हा मसूद अझहरचा धाकटा भाऊ. मसूद अझहर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. इतर 14 सदस्य देशांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली असली तरी एकट्या चीनने या प्रस्तावाला विरोध केला आहे. चीनच्या या विरोधानंतर भारताने यूएन सुरक्षा परिषदेत चीनला फटकारले. 

जगातील काही कुख्यात दहशतवाद्यांविरोधात ठोस पुरावे असूनही हे प्रस्ताव थांबवले जात आहेत, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, चीनने असे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही बीजिंगने यूएनमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारताने आणलेले अनेक ठराव व्हेटो पॉवरने रोखले आहेत. चीनने पाकिस्तानस्थित दहशतवाद्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून सूचीबद्ध करण्यापासून रोखण्याची या वर्षातील ही दुसरी वेळ आहे.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघterroristदहशतवादी