शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चीनने पृथ्वीच्या पोटात उभारली प्रयोगशाळा; इतक्या खोल ड्रॅगन नेमकं काय शोधतोय? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 14:51 IST

चीनने दक्षिण-पश्चिम सिचुआन राज्यात जगातील सर्वात खोल प्रयोगशाळा उभारली आहे.

बीजिंग: चीनने जगातील सर्वात खोल आणि सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळा तयार केल्याची माहिती समोर आली आहे. चिनी वैज्ञानिकांनी या प्रयोगशाळेत कामही सुरू केलंय. चीनच्या दक्षिण-पश्चिम सिचुआन प्रांतात 2400 मीटर खोल ही प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत नेमकं काय सुरू आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. पण, दावा करण्यात येतोय की, या प्रयोगशाळेत अनेक रहस्ये उघड होणार आहेत.

विशेष म्हमजे, चीनची चंद्रावर नजर आहे. रशिया आणि चीनने चंद्रावर आपला बेस बांधण्याबाबत वक्तव्ये केली आहेत. अशा परिस्थितीत चीनला एवढी खोल लॅब बांधण्याची गरज का पडली आणि या भूमिगत प्रयोगशाळेत कोणते काम सुरू आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

काय आहे डार्क मॅटर?मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भूमिगत लॅबमध्ये अल्ट्रा लो रेडिएशन बॅकग्राउंडची सुविधा आहे. चिनी शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, बऱ्याच काळापासून 'डार्क मॅटर' एक रहस्य राहिले आहे. त्याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. या नवीन प्रयोगशाळेमुळे डार्क मॅटरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत होईल. या प्रयोगशाळेला जिनपिंग लॅब असे नाव देण्यात आले आहे. डार्क मॅटर असा पदार्थ आहे, ज्यात कोणतीही ऊर्जा किंवा प्रकाश नसतो. त्यामुळे हा शोधणे कठीण आहे. चिनी शास्त्रज्ञांना यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे शोधून इतिहास रचायचा आहे. 

पृथ्वीच्या खोलात उत्तरे कशी मिळतील?चीनमधील या भूमिगत प्रयोगशाळेच्या पहिल्या टप्प्याचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले होते, परंतु आता ते पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आले आहे. अशा स्थितीत डार्क मॅटरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी एवढी खोल प्रयोगशाळा का खोदली गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे उत्तर चिनी शास्त्रज्ञांनीच दिले आहे. चिनी वृत्तसंस्थेला दिलेल्या उत्तरात प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, आपण जितक्या खोलवर जाऊ तितके कॉस्मिक किरण थांबवू शकू. त्यामुळेच ही लॅब डार्क मॅटर शोधण्यासाठी सर्वोत्तम मानली जात आहे. 

टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीयEarthपृथ्वीJara hatkeजरा हटके