शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

युगांडाचे एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ चीनच्या ताब्यात? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 21:19 IST

Uganda Entebbe International Airport : चीनने पूर्व आफ्रिकन देशातील  (Eastern African Country) युगांडा एंटेबे आंतरराष्ट्रीय विमानतळ (Uganda Entebbe International Airport) आणि इतर मालमत्तांवर कथितरित्या ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे.

युगांडा : कर्जाची परतफेड न केल्यामुळे चीनने (China)विदेशी मालमत्ता ताब्यात घेण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चीनने पूर्व आफ्रिकन देशातील  (Eastern African Country) युगांडा एंटेबे आंतरराष्ट्रीय विमानतळ (Uganda Entebbe International Airport) आणि इतर मालमत्तांवर कथितरित्या ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी (Uganda President Yoweri Museveni) यांनी चीन सरकारशी पुन्हा चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ बीजिंगला पाठवले होते. अलीकडेच, युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एंटेबे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारासाठी 20 कोटी 70 लाख डॉलर कर्ज घेण्यासाठी चीनच्या एक्झिम बँकेसोबत करार केला होता.

SaharaReporters.com या न्यूज पोर्टलनुसार, कर्जाचा परिपक्वता कालावधी (Maturity Period) 20 वर्षांचा होता, ज्यामध्ये  7 वर्षांच्या सवलतीचा कालावधी (Grace Period) सुद्धा सामील होता. परंतु आता असे दिसते आहे की, चीनच्या एक्झिम बँकेने स्वाक्षरी केलेल्या व्यवहाराचा अर्थ असा आहे की, युगांडाने त्यांचे एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ हस्तांतरित केले आहे.  दरम्यान, युगांडाने करारावर पुन्हा चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. मार्च 2021 मध्ये युगांडाने कराराच्या अटींवर पुन्हा चर्चा करण्याच्या आशेने बीजिंगला एक शिष्टमंडळ पाठवले होते.

एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ Allafrica.com या आणखी एका पोर्टलच्या रिपोर्टनुसार, युगांडाच्या सरकारने करारावर स्वाक्षरी करून इतरांसोबतच्या सार्वभौम मालमत्तेच्या वापरासाठी सवलत माफ केल्याचे गूढ उघड झाल्यानंतर, त्या चौकशीपैकी ही पहिलीच चौकशी होती. दरम्यान, एंटेबे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे युगांडातील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. अनेक देशांमध्ये काही आफ्रिकन देश सुद्धा आहेत, ज्यांच्यावर घाईघाईने किंवा योग्य तपासाशिवाय स्वाक्षरी केलेल्या व्यावसायिक कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यानंतर, चीनने थेट नियंत्रणाद्वारे त्यांची राष्ट्रीय मालमत्ता जप्त केली आहे. 

टॅग्स :chinaचीनAirportविमानतळ