चीनमध्ये पावसाचे थैमान, ९८ मृत्युमूखी
By Admin | Updated: June 25, 2016 03:09 IST2016-06-25T03:09:21+5:302016-06-25T03:09:21+5:30
चीनच्या जियांग्सू प्रांतात मुसळधार पावसाने हाहाकार माजवत ९८ लोकांचा बळी घेतला असून, ८०० हून अधिक लोकांना जखमी केले आहे, अशी माहिती सरकारी माध्यमांनी शुक्रवारी दिली.

चीनमध्ये पावसाचे थैमान, ९८ मृत्युमूखी
बीजिंग : चीनच्या जियांग्सू प्रांतात मुसळधार पावसाने हाहाकार माजवत ९८ लोकांचा बळी घेतला असून, ८०० हून अधिक लोकांना जखमी केले आहे, अशी माहिती सरकारी माध्यमांनी शुक्रवारी दिली.
पाऊस, गारपीट आणि वादळामुळे यानचेंग शहरातील अनेक घरे कोसळली आहेत. याशिवाय फुनिंग, शेयांग परगण्यातील अनेक नगरांतही मोठा विध्वंस घडून आला आहे. १२५ कि.मी. प्रति तास एवढ्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांने फुनिंग परगण्यातील अनेक नगरांत हानी घडवून आणली. शेयांग परगण्यात वारे १०० कि.मी. प्रति तास या वेगाने वाहत होते. अनेक घरे कोसळून ५१ जणांचा बळी गेला, तर अनेक जण जखमी झाले. काही भागात वीजपुरवठा खंडित होऊन घरे अंधारात बुडाली, तर काही भागांतील दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली. (वृत्तसंस्था)