शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चीन की अमेरिका? पडले दोन गट; लोकशाही आणि निरंकुशता यापैकी एक निवडण्याची वेळ : पेलोसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 07:00 IST

नॅन्सी पेलोसी या दीर्घकाळापासून चीनच्या टीकाकार राहिल्या आहेत. १९९१ च्या बीजिंगच्या भेटीदरम्यान, पेलोसी यांनी तियानमेन स्क्वेअरवर जात एक बॅनर फडकवला. यावर लिहिले होते, चीनमध्ये लोकशाहीसाठी मरणाऱ्यांसाठी.

बीजिंग : अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यावरून त्यांना आपल्या देशातून मोठे समर्थन मिळत आहे. तसेच, जगभरातील अनेक देशांनी पेलोसी यांच्या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे. तथापि, चीनच्या सहकारी देशांनी चीनला पाठिंबा दिला आहे. यावरून या दोन देशांचे समर्थकही दोन गटात विभागले गेले आहेत.तैवान हा आपला भाग असल्याचा दावा चीन करत आलेला आहे. पेलोसी यांच्या दौऱ्यावरून चीन आणि अमेरिका यांचे सहकारी देश दोन गटात विभागले गेल्याने चीनचा वाढता जागतिक प्रभाव अधोरेखित होत आहे. अर्थात, अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्या प्रशासनाने पेलोसी यांच्या दौऱ्याचे खुले समर्थन केलेले नाही. बायडेन यांनी म्हटले आहे की, तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या काळात हा दौरा योग्य विचार नव्हता. 

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांनी पेलोसी यांच्या दौऱ्यावर कोणतीही टिप्पणी करण्यास नकार दिला. ते म्हणाले की, आम्ही अशा काळातून जात आहोत, जिथे आमच्या क्षेत्रात तणाव वाढला आहे. चीनने या क्षेत्रात अधिक आक्रमक भूमिका घेतलेली आहे. मात्र, तैवानबद्दल आम्हाला असे वाटते की, आहे त्या परिस्थितीत बदल करायला नको. जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाजु मात्सुनो यांनीही पेलोसी यांच्या दौऱ्यावर सावध भूमिका घेतली आहे. अर्थात, सागरी क्षेत्रात चीनच्या सैन्य सरावाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. उत्तर कोरियाने पेलोसींच्या दौऱ्यावर टीका करताना अमेरिकेच्या भूमिकेमुळे क्षेत्रातील शांतता धोक्यात आल्याचे म्हटले आहे.

अमेरिका तैवानला एकटे सोडणार नाही  अमेरिका तैवानला एकटे सोडणार असे अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी म्हटले आहे. पेलोसी यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने तैवानमध्ये अनेक नेत्यांशी चर्चा केली. तैवानच्या राष्ट्रपती साई इंग-वेन यांच्यासोबतच्या चर्चेनंतर पेलोसी यांनी म्हटले आहे की, आज जगासमोर लोकशाही आणि निरंकुशता यातील एक निवडण्याचे आव्हान आहे. तैवान आणि जगात सर्वत्र लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे. दरम्यान, तैवानचा आपला दौरा पूर्ण करून पेलोसी या दक्षिण कोरियाकडे रवाना झाल्या. त्यानंतर त्या सिंगापूर, मलेशिया आणि जपानच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

तैवानवर आर्थिक निर्बंध लादलेचीनने तैवानला नैसर्गिक वाळू पुरवण्यावर बंदी घातली आहे. यामुळे तैवानचे खूप नुकसान होऊ शकते. कोरोना महामारीपासून बांधकाम आणि पायाभूत सुविधांचा विकास तैवानसाठी उत्पन्नाचा स्रोत बनला आहे. अशा स्थितीत वाळूची निर्यात बंद केल्याने तैवानचे आर्थिक नुकसान होणार आहे. चीनचे उपपरराष्ट्र मंत्री झी फेंग यांनी अमेरिकेचे राजदूत निकोलस बर्न्स यांना बोलावले आहे. पेलोसीच्या तैवान भेटीचे गंभीर परिणाम होतील, असे फेंग म्हणाले. 

अमेरिकेला थेट धमकी-जे आगीशी खेळतील, ते जळतीलचीनला घेरण्यासाठी अमेरिका तैवानचा वापर करत असल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले. अमेरिका ‘वन चायना पॉलिसी’ला आव्हान देत आहे. अमेरिकेचा हा दृष्टिकोन आगीशी खेळण्यासारखा असून, तो अत्यंत घातक आहे. जे आगीशी खेळतात, ते स्वतःला जाळून घेतात, असे चीनने म्हटले आहे.

चीनला पेलोसी का आवडत नाहीत?नॅन्सी पेलोसी या दीर्घकाळापासून चीनच्या टीकाकार राहिल्या आहेत. १९९१ च्या बीजिंगच्या भेटीदरम्यान, पेलोसी यांनी तियानमेन स्क्वेअरवर जात एक बॅनर फडकवला. यावर लिहिले होते, चीनमध्ये लोकशाहीसाठी मरणाऱ्यांसाठी. तियानमेन स्क्वेअर हे तेच ठिकाण आहे जिथे १९८९ मध्ये लोकशाहीच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत होते आणि लष्कराने त्यांच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला.

चीनने राजदूतांना केले पाचारण  अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर तणाव वाढला असून, चीनने अमेरिकी राजदूतांना पाचारण करून यावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चीनने इशारा दिला आहे की, अमेरिकेला त्यांच्या चुकांची किंमत मोजावी लागेल. पेलोसी यांच्या दौऱ्यामुळे संतप्त झालेल्या चीनने तैवानच्या हवाई हद्दीजवळ अनेक विमानांचे उड्डाण केले आणि तैवाननजीक सैन्य सराव केला.  

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिका