शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:54 IST

Iran War Impact on China: मिडल ईस्टमध्ये युद्ध सुरू असताना चीनची ऊर्जा सुरक्षा मजबूत का आहे? तेलाचा साठा, इलेक्ट्रिक वाहने आणि कोळशापासून केमिकल निर्मिती

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि अमेरिका-इराण युद्धामुळे जगावर ऊर्जा संकटाचे सावट असताना चीन मात्र मोठ्या प्रमाणात सुरक्षित दिसत आहे. जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश असूनही, चीनने गेल्या २० वर्षांपासून राबवलेल्या दूरगामी धोरणांमुळे आज त्यांच्यावर या युद्धाचा परिणाम इतर देशांच्या तुलनेत कमी होत आहे.

चीनने २००४ पासूनच 'इमर्जन्सी ऑईल रिझर्व्ह' बनवण्यास सुरुवात केली होती. मलक्का सामुद्रधुनीसारख्या मार्गांवरून होणारा पुरवठा भविष्यात विस्कळीत होऊ शकतो, हे ओळखून चीनने मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा साठा करून ठेवला आहे. त्यामुळे सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीतही चीनकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे.

चीन आता पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांवरून वेगाने इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्पांमध्ये चीनने केलेली अफाट गुंतवणूक आता फळाला येत आहे. यामुळे तेलावरील त्यांची अवलंबित्व हळूहळू कमी होत आहे.

कोळशापासून केमिकल निर्मितीचे तंत्रदुसऱ्या महायुद्धात जर्मनीने वापरलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून चीनने आता कोळशापासून मेथेनॉल आणि सिंथेटिक अमोनिया यांसारखी महत्त्वाची रसायने बनवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्लास्टिक आणि रबर उद्योगासाठी त्यांना परदेशातून येणाऱ्या तेलावर अवलंबून राहावे लागत नाही.

जगाचे चीनवर वाढते अवलंबित्वआज व्हिएतनाम आणि फिलीपिन्ससारखे देश ऊर्जा संकटात चीनकडे मदतीची याचना करत आहेत. जगातील पाऊण हिस्सा पॉलिस्टर आणि नायलॉन आजही चीनमध्येच बनते. मात्र, एवढे असूनही चीन अजूनही आपल्या गरजेच्या ७५% तेल आयात करतो, हीच त्यांची एकमेव कमकुवत बाजू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Global fuel shortage spares China: Prepared 20 years ago!

Web Summary : Amidst global energy crisis, China's strategic oil reserves and investments in renewables shield it. Coal-to-chemical technology reduces reliance on imported oil. Vietnam and Philippines seek China's help. Dependence on 75% oil import remains a vulnerability.
टॅग्स :chinaचीनCrude Oilखनिज तेलIranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरFuel Crisisइंधन टंचाईLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई