भारत-चीन संबंधांसंदर्भात अमेरिकेच्या संरक्षण विभागाने अरथात पेंटागॉनने जारी केलेल्या एका ताज्या अहवालावरून चीन जबरदस्त भडकला आहे. अहवालात म्हणण्यात आले आहे की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) कमी झालेल्या तणावाचा फायदा घेत, भारतासोबचे द्विपक्षीय संबंध स्थीर करण्याची चीनची इच्छा आहे. तर भारत-अमेरिका संबंध आणखी मजूबत होण्यापासून रोखायचा त्याचा प्रयत्न आहे. या दाव्याचा चीनने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
चीन पेंटागॉनच्या अहवालाचा निषेध करतो -पेंटागनच्या या टिप्पणीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी गुरुवारी (२५ डिसेंबर) पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिले. "चीन आपल्या राष्ट्रीय संरक्षण धोरणासंदर्भात पेंटागॉनच्या अहवालाचा निषेध करतो. चीन भारतासोबतच्या संबंधांकडे धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टीने बघतो," असे जियान यांनी स्पष्ट केले. भारत-अमेरिका संबंधांत अडथळा निर्माण करण्यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना, चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य करण्यासाठी नाहीत, अशेही ते म्हणाले.
पेंटागॉनच्या अहवालात नेमकं काय? -पेंटागॉनने 'मिलिटरी अँड सिक्युरिटी डेव्हलपमेंट्स इन्वॉल्विंग द पीपुल्स रिपब्लिक ऑफ चायना' नावाने एक अहवालात सादर केल आहेत. यात पंंटागॉनने म्हटले आहे की, चीन एलएसीवरील तणाव कमी होण्याचा लाभ घेत भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध स्थिर करू इच्छित आहे. यामागील मुख्य उद्देश भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होण्यापासून रोखणे हा आहे.
या अहवालात अरुणाचल प्रदेशालाही तैवान आणि दक्षिण चीन समुद्राप्रमाणेच चीनच्या 'कोर इंटरेस्ट' इतके महत्त्व दिले गेले आहे. तसेच, पाकिस्तानसोबत चीनच्या वाढत्या लष्करी संबंधांचाही उल्लेख करण्यात आला आहे.