शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

CPEC मधील प्रकल्पांसाठी चीनकडून निधीच नाही; पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 10:55 IST

China Pakistan Economic Corridor : प्रकल्पांसाठी चीनकडून निधी मिळाला नसल्याचा पाकिस्तानचा दावा

ठळक मुद्देप्रकल्पांसाठी चीनकडून निधी मिळाला नसल्याचा पाकिस्तानचा दावा२०१५ मध्ये चीननं केली होती CPEC अंतर्गत ४६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा

चीननं CPEC या प्रकल्पाच्या निमित्तानं पाकिस्तानात पाय पसरण्यास सुरूवात केली होती. परंतु आता पाकिस्तानला स्वत:ची फसवणूक होत असल्याचं वाटू लागलं आहे. चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिका (CPEC) अंतर्गत कोणत्याही पायाभूत सुविधेच्या प्रकल्पासाठी चीनकडून निधी मिळाला नसल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. सीईसी प्रकल्पांवर सीनेटच्या एका विशेष समितीनं या माहितीचा दावा केला आहे.‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ च्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या नियोजन मंत्रालयाचे परिवहन नियोजन प्रमुख, सिनेटर सिकंदर मंदरू यांनी CPEC अंतर्गत निधी मिळाला नसल्याचं समितीच्या बैठकीत सांगितलं. तसंत यामुळे खुजदार-बसीमा प्रकल्पासह काही प्रकल्प फेडरल आर्थिक निधीमधून बाहेर काढण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं. CPEC वर केवळ कागदी कार्यवागी करण्यात आली होती अशी महिती यावेळी समितीचे सदस्य सीनेटक कबीर अहमद शाही यांनी सांगितलं. "एक चौकीदार आणि एक तंबू लावला आणि अशा प्रकारे या योजनेची सुरूवात झाली. न्यू ग्वादर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चारही बाजूंना एक पडकी इमारत आहे. या व्यतिरिक्त ग्वादर स्मार्ट पोर्ट सिटी मास्टर प्लॅन अंतर्गत कोणतेही प्रकल्प सुरू करण्यात आलेले नाहीत," असंही त्यांनी नमूद केलं. २०१५ मध्ये गुंतवणूकीची घोषणा२०१५ मध्ये चीननं पाकिस्तानमध्ये CPEC अंतर्गत ४६ अब्ज डॉलर्सच्या आर्थिक प्रकल्पांची घोषणा केली होती. अमेरिका आणि भारताचा प्रतिकार करण्यासाठी पाकिस्तान तसंच मध्य आणि दक्षिण आशियामध्ये आपला प्रभाव वाढवण्याचं चीनचं उद्दिष्ट्य होतं. CPEC पाकिस्तानच्या दक्षिण ग्वादर बंदराला (६२६ किलोमीट, कराचीपासून ३८९ मैल पश्चिम) अरबी समुद्रात चीनच्या पश्चिम शिनजियांग क्षेत्राला जोडत असेल. यामध्ये चीन आणि मध्य पूर्व क्षेत्र यांच्या उत्तम संपर्क बनवण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि तेल पाईपलाईन लिंक तयार करण्याची योजनाही सामील आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनCPECसीपीईसीMONEYपैसा