शहरं
Join us  
Trending Stories
1
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
SA vs BAN : WHAT A MATCH! माफक लक्ष्य पण संघर्ष मोठा; गोलंदाजांची कमाल, अखेर बांगलादेश चीतपट
3
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
4
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
5
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
6
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
7
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
8
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
9
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
10
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
11
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
12
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
13
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
14
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
15
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
16
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
17
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
18
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
19
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
20
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा कहर, नवीन रुग्णांमध्ये विक्रमी वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 10:07 AM

China Coronavirus : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनमध्ये लॉकडाऊन, मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

चीनमध्ये पुन्हा कोरोना व्हायरचा प्रादु्र्भाव दिसून येत आहे. गुरुवारी समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, चीनमध्ये महामारी सुरू झाल्यापासून कोरोना प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनमध्ये लॉकडाऊन, मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत.

नॅशनल हेल्थ ब्युरोने सांगितले की, चीनमध्ये बुधवारी 31,454 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 27,517 मध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. चीनची 1.4 अब्ज लोकसंख्या पाहिली तर हा आकडा खूपच कमी असला तरी त्यामुळे चीनमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये चीनमध्ये 29,390 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. मात्र बुधवारच्या आकडेवारी पाहता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एप्रिलमध्ये, चीनच्या मेगासिटी शांघायमध्ये लॉकडाउन लादण्यात आले आणि तेथे लोकांसाठी वैद्यकीय सेवा आणि अन्नाची कमतरता होती.

चीनच्या झिरो कोव्हिड पॉलिसी अंतर्गत, किरकोळ कोरोनाचे रुग्ण आढळल्यास, संपूर्ण शहर लॉक डाऊन केले जाते आणि कोरोना पीडित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कडक क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते. चीनमध्ये कोरोनाला 3 वर्षे पूर्ण होत आहेत. झिरो कोव्हिड पॉलिसीमुळे लोकांमध्ये संताप आहे. याबाबत लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले आहे. चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. कोरोनामुळे चीनच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम झाला आहे.

चाओयांगमध्ये सर्वाधिक प्रकरणेगेल्या मंगळवारी बिजिंगमध्ये कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. यानंतर अधिकाऱ्यांनी उद्याने, कार्यालयीन इमारती आणि शॉपिंग मॉल्स बंद करण्याचे आदेश दिले. बिजिंगचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला चाओयांग जिल्हा पूर्ण लॉकडाउनच्या जवळ पोहोचला आहे. तिथे लोकांना गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असे सांगण्यात आले आहे. चाओयांग जिल्ह्यात सुमारे 3.5 मिलियन लोक राहतात. कोरोनाच्या नवीन रुग्णांचा सर्वाधिक फटका इली भागात बसला आहे. सोमवारी बीजिंगमध्ये 1,400 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 783 प्रकरणे एकट्या चाओयांगमध्ये आढळली होती.

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या