शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

मालदीव, श्रीलंकानंतर आता आणखी एक देश चीनच्या कर्ज जाळ्यात अडकला; 'ड्रॅगन' जमीन बळकावणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 7:37 PM

China Could Seize Montenegro’s Land: चीनच्या कर्जाच्या चक्रव्युव्हात आजवर अनेक देश फसले आहेत आणि आता आणखी एक देशाची अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे.

China Could Seize Montenegro’s Land: चीनच्या कर्जाच्या चक्रव्युव्हात आजवर अनेक देश फसले आहेत आणि आता आणखी एक देशाची अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे. युरोपमधील मॉन्टेनेग्रो नावाच्या छोटाशा देशानं चीनकडून घेतलेल्या एक अब्ज डॉलरची परतफेड करण्यात असमर्थ ठरला आहे. देशातील बेल्ट अँड रोड प्रकल्पासाठी चीनकडून मॉन्टेनेग्रोनं कर्ज घेतलं होतं. याअंतर्गत एक मोठा महामार्ग तयार करण्याचं काम सुरू होतं. पण काही किमीचंच काम पूर्ण होऊ शकलं. आता श्रीलंका आणि मालदीवनंतर मॉन्टेनेग्रो देश देखील चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. (China could now seize land of Montenegro for not paying one billion dollar loan payment)

मॉन्टेनेग्रो देशाला चीनकडून घेतलेलं सारं कर्ज चुकतं करावं लागणार आहे. जर असं केलं नाही, तर देश दिवाळखोर म्हणून घोषित केला जाईल आणि चीन या देशाच्या जमिनीवर आपला दावा ठोकू शकतो. डेलीमेलच्या अहवालानुसार, चीनची सरकारी कंपनी चायना रोड अँड ब्रिज कॉर्पोरेशन या प्रकल्पाशी जोडली गेलेली आहे ही हैराण करणारी गोष्ट आहे. या प्रकल्पाअंतर्गत ज्या पुलाची निर्मिती केली जात आहे त्यासाठी कामगार देखील चीनमधून मागविण्यात आले आहेत. पण या महामार्गाचं काम काही पूर्ण होऊ शकलेलं नाही. 

देशावर जीडीपीपेक्षाही दुप्पट कर्जमॉन्टेनेग्रो देशाला याच महिन्यात एक अब्ज डॉलरचा पहिला हप्ता चीनला द्यायचा आहे. पण इतके पैसे देश देऊ शकणार आहे का? याची कोणतीही स्पष्टता अद्याप नाही. सध्याच्या घडीला देशाच्या एकूण जीडीपीपेक्षाही दुप्पट देशावर कर्ज आहे. चीनसोबत झालेल्या एका करारानुसार जर मॉन्टेनेग्रो देशानं वेळेत कर्जाची रक्कम चुकती केली नाही, तर चीनकडे देशाच्या जमिनीवर हक्क सांगण्याचा अधिकार आहे. 

टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय