शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
3
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
4
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
5
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
6
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
7
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
8
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
9
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
10
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
11
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
12
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
13
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
14
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
15
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
16
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
17
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
18
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
19
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
20
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

China Covid Cases : कोरोना रुग्णसंख्या दडवण्यासाठी चीनची घृणास्पद खेळी, आता ही मोठी माहिती देणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 13:15 IST

आता चीनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. यातच, चीनने कोरोना बाधितांची संख्या लपवण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत.

चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. या महिन्यात चीनमध्ये कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमधील रुग्णालयांशिवाय, स्मशाभूमीतही गर्दी दिसत आहे. चीनने याच महिन्याच्या सुरुवातीला झिरो कोविड पॉलिसी शिथिल केली होती. आता येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. यातच, चीनने कोरोना बाधितांची संख्या लपवण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत.

आता चीन कोरोना संक्रमितांचे आकडे जारी करणार नाही -आपण रविवारपासून (25 डिसेंबर) कोरोना व्हायरसचा डेटा जारी करणार नाही, असे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (China National Health Commission) म्हटले आहे. यापूर्वी, गेल्या तीन वर्षांपासून चीन कोरोनाचे दैनंदीन आकडे जाहीर करत होता. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) अपल्या निवेदनात म्हटले आहे की,  'कोरोनसंदर्भातील माहिती चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनद्वारे (Chinese Center for Disease Control and Prevention) प्रकाशित केले जातील.

20 दिवसांत 25 कोटी कोल संक्रमित झाल्याचा दावा- यातच एका लीक झालेल्या दस्तएवजांमध्ये, चीनमध्ये 1 डिसेंबर ते 20 डिसेंबर या काळात जवळपास 25 कोटी लोक संक्रमित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हाँगकाँगच्या 'साउथ चाइना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या माहितीनुसार,  राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या 20 मिनिटांच्या बैठकीत लीक झालेल्या या दस्तएवजानुसार, 1 ते 20 डिसेंबरदरम्यान 24.8 कोटी लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. चीनच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता हा आकडा 17.65 टक्के एवढा आहे.

एका दिवसात 3.7 कोटी नवे रुग्ण -चीनमध्ये सध्या रुग्ण वाढीसाेबत मृत्यूचेही प्रमाण प्रचंड वाढले आहे. परिस्थिती एवढी भीषण झाली आहे की, मृदतेह ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. चिता शांत हाेण्यापूर्वीच अनेक मृतदेह आणले जात आहेत. एवढेच नाही तर अस्थी मिळविण्यासाठी नातेवाइकांना टाेकन घ्यावे लागत आहेत. ब्लूमबर्गने चीनमधील नॅशनल हेल्थ कमिशनच्या हवाल्याने सांगितले की, मंगळवारी देशात एका दिवसात ३ कोटी ७० लाख नवे काेराेनाबाधित आढळले आहेत. या महिन्यात २० दिवसांत २४ कोटी ८० लाख लोकांना संसर्ग झाला. जानेवारीत एका दिवसात ४० लाख लोकांना संसर्ग झाला होता.

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलXi Jinpingशी जिनपिंग