शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा थैमान; रुग्णांना जागा मिळेना, स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 19:36 IST

येत्या काही दिवसात 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

बीजिंग: जगभरात कोरोना कमी झाला, पण या रोगाची सुरुवात जिथे झाली त्या चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. सरकारने कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर तिथं संसर्गाचा वेग झपाट्यानं वाढत असल्याचे पाहायला मिळतं आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, रुग्णालयात रुग्णांना ठेवण्यासाठी खाटा पुरत नाहीयेत. राजधानी बीजिंगमधील स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार केले जात आहेत. अनेक ठिकाणी अंत्यविधीसाठी प्रतीक्षा यादी 2000 वर पोहोचली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे दिवसात नव्हे तर तासांत दुप्पट होत आहेत.

10 लाख लोकांचा मृत्यू होणारअमेरिकन शास्त्रज्ञ आणि महामारी तज्ज्ञ एरिक फीगेल-डिंग यांनी सोशल मीडियावर चीनचा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रुग्णालये, स्मशानभूमी आणि मेडिकल स्टोअर्सची चिंताजनक परिस्थइती दिसत आहे. कोरोनावर मोठा इशारा देताना ते म्हणाले की, 90 दिवसांत चीनची 60% लोकसंख्या आणि जगातील 10% लोकांना कोरोनाची लागण होईल. जवळपास 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

एप्रिल 2023 मध्ये लाखो मृत्यूची भीतीनुकताच चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHMI) ने अंदाज व्यक्त केला आहे की, 2023 पर्यंत चीनमध्ये कोरोनामुळे 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होईल. चीनमधील कोविड निर्बंध उठवल्यानंतरची परिस्थिती लक्षात घेऊन हे अंदाज लावण्यात आले आहेत. आयएचएमआयचे संचालक क्रिस्टोफर मरे यांच्या मते, एप्रिलपर्यंत चीनच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असेल.

जगात केसेस वाढल्या, भारतात कमी जगभरात कोरोनाची प्रकरणे वाढत असताना भारतात सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (MoHFW) नुसार, 20 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत देशात एकूण 3490 सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक होते. आरोग्यमंत्र्यांनी 19 डिसेंबर रोजी संसदेत सांगितले होते की, भारतात लसीकरणाची संख्या 220 कोटींच्या पुढे गेली आहे. यात पहिला, दुसरा आणि सावधगिरीचा म्हणून घेतलेल्या तिसऱ्या डोसचा समावेश आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम 18 जानेवारी 2021 रोजी देशात सुरू झाली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याchinaचीनDeathमृत्यू