शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

China Coronavirus: हवेच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरतोय कोरोना व्हायरस; शांघाय अधिकाऱ्यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 1:50 PM

एयरोसोल ट्रान्समिशन म्हणजे व्हायरस हवेतील सूक्ष्म कणांमध्ये मिसळतो.

नवी दिल्ली - चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेल्या कोरोना व्हायरसबाबत आणखी एक खुलासा झाला आहे. ज्यामुळे या व्हायरसची तीव्रता प्रकर्षणाने जाणवू शकते. कोरोना विषाणू आता सूक्ष्म हवेमध्ये मिसळून हवेच्या माध्यमातून दुसर्‍या व्यक्तीस हा रोग संक्रमित करीत आहे, ज्याला एयरोसोल ट्रान्समिशन म्हणून ओळखले जाते असा दावा शांघायमधील अधिकाऱ्यांनी केला आहे. आतापर्यंत केवळ विषाणूचे थेट ट्रांसमिशन (कॉन्टॅक्ट ट्रांसमिशन) होत असल्याची खात्री झाली होती. 

शांघाय सिव्हिल अफेयर्स ब्युरोचे उपप्रमुख म्हणाले की, 'एयरोसोल ट्रान्समिशन म्हणजे व्हायरस हवेतील सूक्ष्म कणांमध्ये मिसळतो. वैद्यकीय तज्ञांच्या मते, हे श्वासोच्छवासामुळे याचा संसर्ग पसरत आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून उपाययोजनांबाबत जनजागृती करण्याचे आवाहन या अधिकाऱ्यांनी केलं आहे. 

कोरोना व्हायरसच्या धसक्यामुळे 'या' मुस्लीम देशाने आणली Kiss करण्यावर बंदी

थेट प्रसाराचा अर्थ असा आहे की जर एखाद्या संक्रमित व्यक्तीला शिंका किंवा खोकला आला तर व्हायरस जवळच्या श्वास घेत असलेल्या व्यक्तीमध्ये प्रवेश करेल. त्याच वेळी, जेव्हा विषाणू असलेल्या हवेचे सूक्ष्म कण ऑब्जेक्टला स्पर्श करून एखादी व्यक्ती तोंड, नाक किंवा डोळा स्पर्श करते तेव्हा संपर्क प्रसारित होतो असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे. 

चीन सरकारने लोकांना आवाहन केलं आहे की, एकाच ठिकाणी एकत्रित होण्याचे टाळावे, वेंटिलेशनसाठी खिडक्या उघडा, स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि घरात फवारणी व साफसफाई सुरू ठेवावी, खासकरुन दाराची हँडल्स, जेवणाची टेबल्स आणि शौचालयाच्या जागा स्वच्छ ठेवा विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 811 लोकांचा बळी गेला आहे.

धक्कादायक! अवघ्या 15 सेकंदात 'कोरोना'ची लागण; 722 जणांचा मृत्यू

दरम्यान, चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 30 देशांतील 150 लोकांना त्याची लागण झाली आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. अवघ्या 15 सेकंदात एका व्यक्तीला 'कोरोना'ची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमधील एका 56 वर्षीय व्यक्तीला 15 सेकंदात कोरोनाची लागण झाली. बाजारामध्ये फक्त 15 सेकंदासाठी महिलेच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

कोरोना विषाणूबाबत धोक्याचा इशारा देणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीन