CoronaVirus : चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर! बिजिंगसह 15 शहरांमध्ये प्रादुर्भाव, अनेक उड्डाणे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 10:40 PM2021-07-30T22:40:10+5:302021-07-30T22:41:54+5:30

coronavirus : चीनची राजधानी बीजिंगसह 15 शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

china coronavirus delta variant case surge in beijing 15 other cities | CoronaVirus : चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर! बिजिंगसह 15 शहरांमध्ये प्रादुर्भाव, अनेक उड्डाणे रद्द

CoronaVirus : चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर! बिजिंगसह 15 शहरांमध्ये प्रादुर्भाव, अनेक उड्डाणे रद्द

Next

बिजिंग : चीनमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये अचानक वाढ झाली आहे. चीनची राजधानी बीजिंगसह 15 शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. डिसेंबर 2019 मध्ये वुहानमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सरकारी मीडियाने याला सर्वात व्यापक स्थानिक रोगाचा प्रसार म्हटले आहे. 'ग्लोबल टाईम्स'ने म्हटले आहे की, कोरोना प्रकरणांमध्ये नवीन वाढ पूर्व चीनच्या जिआंग्सु प्रांताची राजधानी नानजिंग येथील विमानतळापासून सुरू झाली आहे आणि पाच इतर प्रांतामध्ये आणि बीजिंग नगरपालिकेत पसरली आहे.

यात म्हटले आहे की, नानजिंग शहरातील अनेक विमानतळांवरील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सर्व उड्डाणे थांबविली आहेत. वेगाने पसरलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणे चीनच्या 15 शहरांमधून समोर आली आहेत. डेल्टा व्हेरिएंट आधी भारतात आढळल्याचे म्हटले जात होते. मात्र, चीनमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकरणांची संख्या अजूनही शेकडोमध्ये आहे, परंतु विविध प्रांतांमध्ये संसर्गाच्या व्यापक प्रसाराबद्दल चिंता वाढली आहे.

चीनने अद्याप भारत आणि इतर अनेक देशांमधून विमान प्रवास सुरू करणे बाकी आहे आणि बीजिंगला जाणारी बहुतांश आंतरराष्ट्रीय उड्डाणे इतर शहरांकडे वळवली आहेत. जिथे राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांना 21 दिवसांसाठी क्लारंटाईन होणे आवश्यक होते. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या मते, गुरुवारपर्यंत चीनमध्ये कोरोना झालेल्या प्रकरणांची एकूण संख्या 92,875 होती. यात 932 रुग्णांचा उपचार सुरू असून त्यापैकी 25 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

गेल्या वर्षीपासून या कोरोना व्हायरसने चीनमध्ये 4,636 लोकांचा बळी घेतला आहे. अधिकृत मीडियाच्या माहितीनुसार, चीनने आतापर्यंत आपल्या लोकसंख्येच्या जवळपास 40 टक्के लसीकरण केले आहे. 2019 च्या अखेरीस मध्य चीनच्या वुहान शहरात कोरोनाव्हायरस पहिल्यांदा सापडला. यानंतर ते चीन आणि जगभरात झपाट्याने पसरले आणि मार्च 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने याला महामारी घोषित केले.

Web Title: china coronavirus delta variant case surge in beijing 15 other cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.