शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

China Corona Updates: 90 दिवसात 90 कोटी रुग्ण, डॉक्टरदेखील आजारी; चीनमध्ये योणार कोरोनाची 'त्सुनामी'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 13:45 IST

China Corona Updates: डिसेंबरच्या सुरुवातीलाच चीन सरकारने झिरो-कोविड पॉलिसी काढून टाकली होती. तेव्हापासून संसर्ग झपाट्याने वाढत आहे.

China Corona Updates: चीनमध्ये कोरोनाची 'त्सुनामी' येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. रूग्णांना दाखल करण्यासाठी रूग्णालयात जागा नाही. अंत्यविधीसाठीही तासन्तास वाट पाहावी लागते. महामारीतज्ञांचा असाही अंदाज आहे की, चीनची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या कोरोनाला बळी पडू शकते. संसर्गाच्या वाढत्या वेगाने, विशेषज्ञांनी केलेले भाकीत आणखीनच भयावह दिसत आहेत. तीन दिवसांपूर्वी ब्लूमबर्गने आपल्या अहवालात सांगितले आहे की या आठवड्यात चीनमध्ये एका दिवसात कोरोनाचे 37 दशलक्ष प्रकरणे समोर येऊ शकतात. हा आकडा आतापर्यंतचा उच्चांक असेल.

90 कोटी लोकांना लागण होणारसाऊथ चायना मॉर्निंग पोस्टने लीक झालेल्या दस्तऐवजाचा हवाला देत म्हटले की, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचा असा विश्वास आहे की 1 ते 20 डिसेंबर दरम्यान देशात सुमारे 250 मिलियन लोकांना संसर्ग झाला आहे. म्हणजेच अवघ्या 20 दिवसांत देशातील सुमारे 18 टक्के लोकसंख्या संसर्गाच्या विळख्यात आली आहे. एपिडेमियोलॉजिस्ट एरिक फिगेल डिंग यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील 90 दिवसांत चीनमधील 60 टक्के आणि जगातील 10 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पुढील तीन महिन्यांत चीनमधील सुमारे 90 कोटी लोकांना कोरोनाची लागण होईल. या काळात लाखो लोकांचा मृत्यू होण्याचीही शक्यता आहे.

चिनी शहरांमध्ये दररोज लाखो प्रकरणेडिसेंबरच्या सुरुवातीलाच चीन सरकारने झिरो-कोविड पॉलिसी काढून टाकली होती. तेव्हापासून संसर्ग झपाट्याने वाढत आहे. चीनने आता कोविड प्रकरणांची नोंद न ठेवण्याचे सांगितले आहे. परंतु चीनचे आरोग्य अधिकारी हे मान्य करत आहेत की शहरांमध्ये दररोज लाखो संक्रमित समोर येत आहेत. रविवारी शांघायपासून थोड्याच अंतरावर असलेल्या झेजियांग शहरात दहा लाखांहून अधिक रुग्ण दिसू लागले आहेत. हा आकडा काही दिवसांत दुप्पट होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. म्हणजे एका दिवसात 20-20 लाख केसेस. 

डॉक्टरही आजारी पडताहेतकोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्याने चीनची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. रूग्णांना दाखल करण्यासाठी रूग्णालयात जागा नाही. वृत्तसंस्थेनुसार, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांशी संबंधित लोकांनाही कोरोनाची लागण होत आहे आणि तरीही ते रुग्णांवर उपचार करत आहेत. चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने शनिवारी आपल्या अहवालात सांगितले होते की, बीजिंगमधील रुग्णालयातील आयसीयू वॉर्ड भरले आहेत. शवागार आणि स्मशानभूमीच्या बाहेर रांगा आहेत. मात्र, त्यानंतरही सरकारने बीजिंगमध्ये केवळ 7 मृत्यू स्वीकारले आहेत. रुग्णालयांमध्ये भरणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने आता डॉक्टरांना ऑनलाइन कोरोना रुग्णांचा सल्ला घेण्याची आणि औषधे लिहून देण्याची परवानगी दिली आहे. त्याला स्थानिक भाषेत 'इंटरनेट हॉस्पिटल' असे संबोधले जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारत