शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास मोदींची मदत करू- चीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 08:50 IST

भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करू शकतो, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे.

ठळक मुद्देभारतात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करू शकतोमोदींनी भारताला नियंत्रणात ठेवावं, अशी चीनची इच्छा आहे. भारतात कमी प्रमाणात रोजगार उपलब्ध असल्यानं मोदींना जनतेच्या असंतोषाचा सामना करावा लागत आहे.

नवी दिल्ली- भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करू शकतो, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे. मोदींनी भारताला नियंत्रणात ठेवावं, अशी चीनची इच्छा आहे. भारतात कमी प्रमाणात रोजगार उपलब्ध असल्यानं मोदींना जनतेच्या असंतोषाचा सामना करावा लागत आहे. चीनसाठी ही चांगली बातमी नाही, असंही ग्लोबल टाइम्समधून छापण्यात आलं आहे.रिपोर्टनुसार, डोकलाममध्ये दोन्ही देशांच्या सेना एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर जवळपास वर्षभरानं दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारत आहेत. भारतातलं केंद्र सरकारनं हे कमजोर आहे. त्यामुळे मोदींनी स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भारत आणि चीनदरम्यान आर्थिक द्विपक्षीय संबंधही मजबूत असून, ते वेगानं पुढे जात आहेत. तसेच मोदींनी चीनकडून येणारी गुंतवणूक वाढवल्यास भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे मोदींच्या प्रतिमेतही सुधारणा होऊ शकते. भारत हा देश धर्मसंकटात अडकला आहे. दिल्लीनं चीनमधून येणारी गुंतवणूक थांबवल्यास अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत.भारतात चीनची गुंतवणूक ही मुख्यत्वे कामगारांशी जोडलेल्या क्षेत्रात आहे. जसे की स्मार्टफोन प्लांट वगैरे वगैरे. जर भारतानं चिनी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्यास मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारनं रोजगार उपलब्ध करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. अशातच चीनकडून येणारी गुंतवणूक वाढवल्यास बऱ्याच नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात, असंही ग्लोबल टाइम्समध्ये म्हटलं आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधीही म्हणाले होते की, चीन उत्पादन क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यामुळे त्यांच्या नोकऱ्यांची कमी नाही. भारतानंही उत्पादन क्षेत्राला चालना दिली पाहिजे, जेणेकरून भारतात नोकऱ्या उपलब्ध होतील. रोजगाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनीही मोदींवर टीका केली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन