शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

अखेर चीन नरमला! WHO तज्ज्ञांच्या पथकाला कोरोना तपासाची परवानगी

By देवेश फडके | Published: January 11, 2021 1:51 PM

१४ जानेवारी २०२१ रोजी WHO मधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे एक पथक चीन दौऱ्यावर जात आहे. WHO तज्ज्ञांचे पथक वुहान शहराचा दौरा करणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

ठळक मुद्देकोरोना उत्पत्ती आणि प्रसार यांबाबत WHO च्या तज्ज्ञांचे पथक चीनला जाणारचीन सरकारकडून अखेर WHO मधील तज्ज्ञांच्या पथकाला परवानगी WHO मधील तज्ज्ञ पथकाच्या वुहान दौऱ्याबाबत अस्पष्टता

बीजिंग : अवघ्या जगभरात वेगाने पसरलेल्या कोरोना विषाणू उत्पत्तीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेमधील (WHO) आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे एक पथक चीनमध्ये जाऊन संशोधन करणार होते. मात्र, चीनने या तज्ज्ञांच्या टीमला परवानगी होती. अखेर चीनने नरमला असून, WHO मधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या पथकाला परवानगी देण्यात आली आहे. 

चीनमध्ये जाऊन कोरोना विषाणू उत्पत्ती, संसर्ग, प्रसार याचा शोध घेण्यासाठी WHO मधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या पथकाला चीन सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. १४ जानेवारी २०२१ रोजी WHO मधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे एक पथक चीन दौऱ्यावर जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे काही तज्ज्ञ गुरुवार, १४ जानेवारी २०२१ रोजी चीनमध्ये येऊन कोरोना विषाणू उत्पत्तीबाबत संशोधन करणार आहेत. चीनचा राष्ट्रीय आरोग्य आयोगातील समकक्ष अधिकाऱ्यांची WHO च्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसोबत बैठक होणार आहे, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाकडून देण्यात आली. 

WHO तज्ज्ञांचे पथक वुहान शहराचा दौरा करणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. चीनकडून WHO तज्ज्ञांच्या दौऱ्याबाबत अधिक आणि विस्तृत माहिती देण्यात आलेली नाही. चीनच्या वुहान येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. यामुळे जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाच्या चाचणी आणि अभ्यासासाठी जानेवारी महिन्यांत १० सदस्यांची टीम चीनला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, चीनमधील अधिकाऱ्यांनी याबाबतची परवानगी नाकारली होती. 

दरम्यान, चीनच्या अधिकाऱ्यांनी आमच्या टीमला चीनमध्ये येण्यासाठीच्या आवश्यक परवानग्या दिल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या पथकाला चीनमध्ये येण्यास चीन सरकारने ऐनवेळी नकार दिल्याने आम्ही अतिशय नाराज आहोत. असे जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रॉस घेब्रेसस यांनी म्हटले होते. कोरोना विषाणूच्या उद्रेकावरुन जागतिक पातळीवर चीनवर जोरदार टीका करण्यात आली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूला थेट 'चीनी व्हायरस' असे संबोधले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाchinaचीन