मुलांनी शिक्षकाला महिला अंतर्वस्त्राची जाहीरात पाहताना पकडले
By Admin | Updated: March 15, 2016 12:11 IST2016-03-15T11:53:32+5:302016-03-15T12:11:15+5:30
परदेशात शाळेतील एका शिक्षकाला अशाच विसरभोळेपणामुळे विद्यार्थ्यांनी महिलांच्या अंर्तवस्त्राची जाहीरात पाहाना पकडले.

मुलांनी शिक्षकाला महिला अंतर्वस्त्राची जाहीरात पाहताना पकडले
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १५ - काहीवेळा शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना शिकवून झाल्यानंतर आपल्या कामात गढून जातात. त्यांना आपल्या आसपास काय सुरु आहे याचा विसर पडतो. परदेशात शाळेतील एका शिक्षकाला अशाच विसरभोळेपणामुळे विद्यार्थ्यांनी महिलांच्या अंतर्वस्त्राची जाहीरात पाहताना पकडले.
परदेशातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरव्दारे शिकवले जाते. विद्यार्थ्यांना गणिताचा विषय शिकवल्यानंतर संबंधित पुरुष शिक्षक आपल्या लॅपटॉपवर इबेवरील महिला अंतर्वस्त्राची जाहीरात पाहण्यात गुंग झाला. प्रोजेक्टरला जोडलेला लॅपटॉप बंद करायला हा शिक्षक विसरला.
सर्व विद्यार्थी अभ्यासामध्ये गुंतलेले असताना हा शिक्षक इबेवरील महिला अंतर्वस्त्राच्या जाहीराती पाहता होता. त्याचवेळी एका विद्यार्थ्यांचे प्रोजेक्टवर लक्ष गेले. त्याने या संपूर्ण घटनेचे मोबाईलवरुन व्हिडीओ चित्रीकरण केले आणि रेडिटवर तो व्हीडीओ अपलोड केला. तास संपल्यानंतर हा शिक्षक लॅपटॉप बंद करुन दुस-या वर्गावर केला. वर्गात काय चालू आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात आले नाही.