चार्ली हेब्डोच्या एका अंकाची किंमत ११ लाख रुपये
By Admin | Updated: January 16, 2015 08:31 IST2015-01-16T05:15:23+5:302015-01-16T08:31:57+5:30
संधी मिळाली की किंमती वाढवून ग्राहकांकडून पैसे उकळायचे असे प्रकार फक्त भारतातच घडतात असे नाही. बुधवारी जेव्हा चार्ली हेब्डो

चार्ली हेब्डोच्या एका अंकाची किंमत ११ लाख रुपये
पॅरिस : संधी मिळाली की किंमती वाढवून ग्राहकांकडून पैसे उकळायचे असे प्रकार फक्त भारतातच घडतात असे नाही. बुधवारी जेव्हा चार्ली हेब्डो साप्ताहिकाचा हल्ल्यानंतरचा अंक बाजारात आला , आणि ५० लाख प्रतीही हातोहात विकल्या गेल्या तेव्हा या साप्ताहिकाच्या आॅन लाईन अंकाची किंमत चक्क ११ लाख रुपये लावण्यात आली. चार्ली हेब्डो हे व्यंग साप्ताहिक दहशतवादी हल्ल्यात १२ लोक ठार झाल्यानंतर बुधवारी प्रसिद्ध झाले. नेहमी ६३ हजार प्रती छापणाऱ्या या साप्ताहिकाच्या ५० लाख प्रती प्रसिद्ध करण्यात आल्या. पण त्याही खपल्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा म्हणून लोकांनी रांगा लावून प्रती विकत घेतल्या.