Celebrity Chef Floyd Cardoz Dies Of Coronavirus In New York After Returning From Mumbai kkg | Coronavirus: भारतीय वंशाच्या सेलिब्रिटी शेफचा अमेरिकेत मृत्यू; याच महिन्यात मुंबईत दिली होती २०० जणांना पार्टी

Coronavirus: भारतीय वंशाच्या सेलिब्रिटी शेफचा अमेरिकेत मृत्यू; याच महिन्यात मुंबईत दिली होती २०० जणांना पार्टी

न्यूयॉर्क: जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून अनेक दिग्गजांनादेखील कोरोनाची लागण झालीय. कोरोनाचा संसर्ग झाल्यानं भारतीय वंशाचे सेलिब्रिटी शेफ फ्लॉएड कार्डोज यांचा मृत्यू झालाय. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या कार्डोज यांना कोरोनाची बाधा झाल्याचं गेल्याच आठवड्यात समोर आलं. फ्लॉएड याच महिन्यात मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत एक पार्टी दिली होती. त्यानंतर ते अमेरिकेला परतले होते. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे ७७३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

न्यूयॉर्कमध्ये फ्लॉएड यांच्या मालकीची शेज फ्लॉएड, बॉम्बे कँटिन आणि ओ पेड्रो नावाची रेस्टॉरंट्स आहेत. मुंबई आणि गोवातही त्यांची रेस्टारंट्स आहेत. फ्लॉएड याच महिन्यात मुंबईला आले होते. त्यांनी मुंबईत एक पार्टीदेखील दिली होती. यामध्ये २०० जण सहभागी झाले होते. यानंतर फ्लॉएड अमेरिकेला परतले. त्यानंतर त्यांना ताप आल्यानं ते रुग्णालयात दाखल झाले. चाचणीनंतर त्यांना कोरोना झाल्याचं आढळून आलं. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यात आली.

अमेरिकेत आतापर्यंत ५४ हजार ४२८ कोरोनाची बाधा झालीय. कोरोनामुळे अमेरिकेत ७७३ जणांनी जीव गमावला आहे. न्यूयॉर्क शहरातील अवस्था अतिशय वाईट असून २६ हजार ४३० जणांना कोरोनाची लागण झालीय. तर २७१ जणांचा मृत्यू झालाय. न्यू जर्सीमध्ये ३ हजार ६७५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ४४ जणांचा जीव गेलाय. मंगळवारी अमेरिकेत कोरोनामुळे १९७ जणांचा मृत्यू झाला. 

Web Title: Celebrity Chef Floyd Cardoz Dies Of Coronavirus In New York After Returning From Mumbai kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.