शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकाला पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 06:04 IST

पूर्व लडाखमधील घटना; भरकटल्याने हद्दीत आल्याचा त्या सैनिकाचा दावा

लडाख : भारत आणि चीन यांच्यात तणाव कायम असतानाच पूर्व लडाखमध्ये चुशूल विभागातील गुरंग खोऱ्याजवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी करून भारतीय हद्दीत आलेल्या चीनी सैनिकाला भारतीय लष्कराने ताब्यात घेतले आहे. दिशा भरकटल्याने आपण भारताच्या हद्दीत आल्याचा दावा या सैनिकाने केला आहे. सध्या याची चौकशी सुरू असून समाधानकारक माहिती मिळाल्यानंतरच त्याला चीनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे.भारतीय लष्कराने माहिती दिली की, शुक्रवारी सकाळी भारतीय हद्दीत आलेल्या चीनी सैनिकाला पकडण्यात आले आहे. 

पूर्व लडाखमध्ये मागच्या वर्षीपासून दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव आहे. दोन्ही देशांचे सैन्य सध्या समोरासमोर उभे आहे. दोन्ही बाजूंनी लढाऊ विमाने तसेच अत्याधुनिक शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत.  दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी आणि मुत्सद्दी याच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पडल्या परंतु सीमावादातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. आक्रमक चीनला भारताने प्रत्येक आघाडीवर तोडीस तोड उत्तर दिले आहे. (वृत्तसंस्था)

चीनमध्ये अडकलेले २३ भारतीय नाविक १४ पर्यंत परतणारनवी दिल्ली : चीनमध्ये अडकलेले २३ भारतीय नाविक १४ जानेवारीपर्यंत भारतात परतणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. मालवाहू जहाज एमव्ही जग आनंद जपानच्या चिबाकडे कूच करणार आहे. बंदरे व जहाजबांधणी राज्यमंत्र्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चीनमध्ये आमचे नाविक अडकलेले आहेत. एमव्ही जग आनंद या जहाजावर ते आहेत. चालक दलात बदल करण्यासाठी चिबा, जपानकडे ते जहाज प्रवास सुरू करणार आहे. भारतीय नाविक दलाचे दोन मालवाहू जहाज अनेक महिन्यांपासून चिनी जलक्षेत्रात उभे आहेत. इतर काही जहाजांनी त्यांचा माल उतरवला असला तरी या जहाजांना माल उतरण्याची परवानगी दिली जात नाही. चीनने २५ डिसेंबर रोजी म्हटले होते की, भारत-चीनच्या तणावपूर्ण संबंधांमुळे चीनच्या बंदरांवर भारतीय नाविक अडकलेले नाहीत.  विदेश मंत्रालयाने म्हटले होते की, दोन मालवाहू जहाज चिनी जलक्षेत्रात अडकले असून, त्यावर ३९ भारतीय नाविक आहेत. 

काय म्हणाले विदेश मंत्रालय?विदेश मंत्रालयाचे सचिव अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले होते की, या स्थितीत नाविक खूपच तणावात आहेत. या संकटाच्या काळात ग्रेट ईस्टर्न शिपींग कंपनीचा मानवीय दृष्टीकोन व संकटाच्या काळात त्यांच्याबरोबर उभे राहण्याचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. त्यांनी ३० डिसेंबर २०२० रोजी म्हटले होते की, चीनमध्ये अडकलेल्या नाविकांना लवकरच परत आणले जाईल. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतladakhलडाख