मोदींवरील खटला अमेरिकेत रद्द
By Admin | Updated: January 16, 2015 05:09 IST2015-01-16T05:09:10+5:302015-01-16T05:09:10+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील गुजरात दंगल प्रकरणी दाखल करण्यात आलेला खटला अमेरिकन न्यायालयाने रद्द केला आहे.

मोदींवरील खटला अमेरिकेत रद्द
न्यूयॉर्क : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील गुजरात दंगल प्रकरणी दाखल करण्यात आलेला खटला अमेरिकन न्यायालयाने रद्द केला आहे. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान असल्याने त्यांना या खटल्यापासून संरक्षण मिळावे, अशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा सरकारची भूमिका आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्यातील जिल्हा न्यायमूर्ती अनालिसा तोरेस यांनी यासंदर्भात दिलेले स्पष्टीकरण असे की, मोदी हे परदेशातील मुख्य पदावर आहेत, या नात्याने ते या खटल्यासंदर्भात न्यायालयाच्या कक्षेत येत नाहीत. अमेरिकेतील वकिलाने केलेले दावे या न्यायालयाने मान्य केले आहेत.