४६ मीटर हिमपर्वत आला वाहून
By Admin | Updated: April 25, 2017 00:40 IST2017-04-25T00:40:51+5:302017-04-25T00:40:51+5:30
कॅनडातील न्यू फाऊंडलँड अचानक पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले. त्याच्या किनाऱ्यावर महाकाय असा बर्फाचा डोंगर दृष्टीस पडला.

४६ मीटर हिमपर्वत आला वाहून
न्यू फाऊंडलँड : कॅनडातील न्यू फाऊंडलँड अचानक पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले. त्याच्या किनाऱ्यावर महाकाय असा बर्फाचा डोंगर दृष्टीस पडला. स्थानिक बातम्यांनुसार ईस्टर वीकेंडनिमित्त टाऊन आॅफ फेरीलँडच्या दक्षिण किनारी राजमार्गनजीक लोकांचा जमाव जमला आणि ते बर्फाच्या डोंगराची छायाचित्रे घेत होते. महापौर अॅड्रीयन कवानाग म्हणाले की, ‘‘अचानक खूप मोठ्या संख्येने पर्यटकांना पाहून मला आश्चर्य वाटले.’’ ते म्हणाले, ‘‘हा खूप मोठ्या आकाराचा हिमपर्वत आहे व तो खूप जवळही आहे व लोक त्याची खूप जवळून छायाचित्रेही घेऊ शकतात.’’ हा हिमपर्वत ४६ मीटर उंच असून, तो एवलॉनच्या पाण्यात थांबला आहे. तेथील रहिवासी डॉन कोस्टेल्लो यांनी सांगितले की, ‘‘हा हिमपर्वत लवकर पुढे सरकणार नाही. जोपर्यंत हवा थांबेल तोपर्यंत हा पर्वत तेथेच राहील. कारण हा पर्वत उथळ जमिनीवर तयार झालेला आहे.’’